ब्रेकिंग

नाशिक महानगरपालिकेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

– नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, महिला कायदे, हक्क, व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन..*

नाशिक महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिना’ निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम स्व. सदाशिव गंगाराम भोरे कलामंदिर, हिरावाडी, नाशिक येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमास महापौर श्रीमती. हिमगौरी आडके, उपमहापौर श्री. विलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री. प्रदिप चौधरी, समाजकल्याण उपायुक्त श्री. नितीन नेर, उपायुक्त श्रीमती सुवर्णा दखणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अजिता साळुंखे, शिक्षणाधिकारी मिता चौधरी, सिटीलिंकच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सुरेखा जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त श्री. प्रदिप चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत महिला दिनाचे महत्व विषद करतांनाच महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाचा थोडक्यात आढावा देतांनाच येत्या काळात महापौर श्रीमती. हिमगौरी आडके यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालकल्याण विभाग अधिकाधिक सक्षमपणे काम करून अधिकाधिक महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती. सुरेखा जाधव यांनी महिला दिन का साजरा केला जातो व महिला दिनाचे महत्व अधोरेखित केले.
महिला दिनाचे महत्व विषद केले. तर उपमहापौर श्री. विलास शिंदे यांनी या नाशिक शहराचेच नव्हे तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नेतृत्व एक महिला आणि ते हि अगदी सक्षमपणे करीत असल्याचा मला अभिमान आहे. असे प्रतिपादन करत सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तर महापौर श्रीमती. हिमगौरी आडके यांनी महिलांनी आपल्या १४ वर्षांवरील मुलींना HPV लस देऊन त्यांचे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण करावे असे आवाहन करतांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी अँड. गौरी पटवर्धन यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा, २०१३ या कायद्याबाबत माहिती देतांनाच महिलांच्या हक्काविषयी मार्गदर्शन केले.
तर महापालिका कर्मचारी कल्पना दातीर यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
गुरुवारी पार पडलेल्या या कार्यक्रमास विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन, सिटीलिंक जनसंपर्क अधिकारी दिपाली घाटोळ, नामपा कर्मचारी नितीन बागुल, सोमनाथ कासार, आत्मज उपासनी,आदींसह महिला अधिकारी, कर्मचारी, सिटीलिंक अधिकारी, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे