ब्रेकिंग

विकास कामे ठरतायत नागरिकांसाठी अपघाताचे कारण.

शहारात प्रवास करताना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

नाशिक जनमत  कुंभमेळ्यामुळे शहरातील रस्ते चांगल्या रीतीने बनवण्याचे काम नाशिक महानगरपालिका व स्मार्ट सिटी मार्फत चालू आहे परंतु नागरिकांना रिकामे युद्ध पातळीवर होत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.   शहरातील वर्दळीचा असणाऱ्या सीबीएस-त्र्यंबक रोडवर सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या रस्ता दुरुस्ती कामांमुळे सामान्य नागरिकांना फटका बसत आहे. जिल्हा

 

 

 

रुग्णालयासमोरून जाणाऱ्या ८०० मीटरच्या रस्त्यावर गेल्या पंधरवड्यापेक्षा अधिक काळापासून ‘मिलिंग’चे (रस्ता खरवडण्याचे) काम करण्यात आले. यानंतर हा रस्ता तसाच अर्धवट सोडण्यात आल्यामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या या उफारट्या कारभारावर नाशिककरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशीच अवस्था गंजमाळ परिसरातही दिसून येत आहे.

 

रस्त्यावर नवीन डांबरी थर टाकण्यापूर्वी रस्त्याचा जुना पृष्ठभाग यंत्राच्या सहाय्याने खरवडला जातो. जेणेकरून नवीन थर व्यवस्थित चिटकून रहायला हवा. या प्रक्रियेस ‘मिलिंग’ म्हटले जाते. मात्र, रस्त्याचे काम हे रात्र दिवस करून ताबडतोब करण्यास हवे परंतु ते तसे न होता त्यास महिना महिना लागत आहे. दरम्यान रस्त्यावर एकतर्फे वाहतूक झालेली आहे त्रंबक नाका हारदारीचा रस्ता असून सीबीएस ठक्कर बाजार आदिवासी विकास भवन पंचवटी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी जोडणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर चालू असलेल्या कामामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे  वाट चालवताना वान हलत हलत चालते. या रस्त्यावर प्रवास करणे अतिशय धोकादायक झाले आहे. संपूर्ण नाशिक शहरांमध्ये विकासाची कामे चालू असली तरी नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. रस्त्याचे डांबरीकरण करताना जुन्या रस्त्यावर मिलिंग केले जाते. त्यामुळे डांबरीकरण करताना ओरखडलेले रस्ते डांबराशी पक्के

 

 

(रस्त्यावर मशनरी आले असल्या तरी त्या दिवसा बंद स्वरूपात आहे. युद्ध पातळीवर काम करणे गरजेचे झाले आहे )

एकरूप होऊन रस्ता पक्का होतो असे बोलले जाते दरम्याने रस्त्यावरील कामे ताबडतोब करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. सध्या तरी शहरातील लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार खासदार महापौर यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाहेरगावावरून आल्या आलेल्या भाविकांना मोठा त्रास सध्या विकास कामांमुळे होऊ लागला असल्याचे चित्र आहे. रामकुंड परिसरामध्ये भाविक उडणाऱ्या धुळीमुळे हैराण झाले आहे. नाशिक ते त्र्यंबक रस्ता देखील काम चालू असल्याने सर्वत्र धुळसूळ आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे