जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांचे वाहन दरीत कोसळून दहा सैनिक ठार. सतरा जण जखमी झाल्याची भीती.

नाशिक जन्मत काल जम्मू काश्मीर मध्ये सैनिकांचे वाहन दरीत पडून दहा सैनिक ठार झाल्याची बातमी आली आहे तर 11 जण जखमी आहेत. अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली असून संपूर्ण देशावर दुःखाची सावट निर्माण झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात
दहशतवादविरोधी कारवाईसाठी जात असलेले भारतीय लष्कराचे चिलखती वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात गुरुवारी १० जवानांचा मृत्यू झाला, तर अन्य ११ जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भद्रवाह-चंबा आंतरराज्यीय मार्गावरील सुमारे नऊ हजार फूट उंचीवरील खन्नी टॉप येथे दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. बुलेटप्रूफ ‘कॅस्पिर’ वाहनाच्या चालकाचे
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळले. कॅस्पिर हे सुरुंगरोधक प्रकारातील वाहन असून, सुरुंग किंवा आयईडी स्फोटकांचा धोका

असलेल्या संवेदनशील क्षेत्रात त्याचा वापर केला जातो. लष्कराच्या जम्मूस्थित ‘व्हाइट नाइट कोर’ ने ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत, प्रतिकूल हवामानात अवघड भूभागातून वाघ जात असताना रस्त्यावरून घसरण्याचे सांगण्यात येत आहे. लष्कर व पोलिसांनी संयुक्त बचाव कार्य सुरू करून

जखमींना उपचारासाठी दवाखान्यात ताबडतोब देण्यात आले. व उपचार चालू करण्यात आले. या घटनेने संपूर्ण देशावर शोक काळा पसरली असून शोक व्यक्त करण्यात येत आहे.



