प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिंदे गट शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार ची प्रचारात आघाडी.
नाशिक जन्मत महानगरपालिका निवडणुकी च्या प्रचार सध्या जोरात चालू असून मखमलाबाद परिसरा तील प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व पुरस्कृत व युतीचे उमेदवार अनुक्रमांक तीन ) इंदुमती अरुण भोये .( खोसकर ) श्री दामोदर अण्णा नारायण मानकर अनुक्रमांक 4 ) सुनीता ताई नानेश्वर पिंगळे अनुक्रमांक 6) श्री प्रमोद (बापू) देवराम पालवे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
अनेक ठिकाणी चौक सभा चालू झाले असून प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे स्वागत सत्कार केले जात आहे. शांतीनगर क्रांतीनगर मखमला बाद गाव महादेव कॉलनी वडजाई माता नगर इत्यादी परिसरातून त्यांचे प्रचार रॅली निघत असून. प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार चालू झाला आहे. चारी ही उमेदवार मतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे मतदारांना सांगत आहे.
महादेव कॉलनी वडजाई माता नगर इत्यादी भागांमध्ये नव्याने नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत या ठिकाणी पाण्याच्या तसेच रस्त्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
गृहनिर्माण खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी प्रभागासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे असे त्यांनी घेतलेल्या चोक सभेतून मतदारांना सांगितला आहे
नारायण मानकर फाउंडेशन तर्फे मतदारांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच मोफत देखील नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक सहा मध्ये वैकुंठ रथ मोफत उपलब्ध करून दिला आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जिम व उद्याने उभारणार असल्याचेही चारी उमेदवार मतदारांना सांगत आहे. मखमलाबाद परिसरामध्ये शंभर खाटीचे नवीन रुग्णालय नागरिकांसाठी प्रभागामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असेही त्यांनी नाशिक जन्म त जवळ बोलून दाखवले. मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी उमेदवारांचे स्वागत करून ऑप्शन करताना दिसून येत आहे..
जिजाऊ फाउंडेशनचे संस्थापक श्री प्रमोद देवराम पालवे यांनी पावसाळ्यात झालेल्या खड्ड्यात खड्डे मुक्त रस्ता करण्यासाठी आंदोलन देखील केले होते. जिजाऊ फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ते करत असतात. प्रभागातील नागरिकांसाठी नवरात्र उत्सव मध्ये दाडीया आयोजन करतात..
प्रभागातील नागरिकांसाठी चारी उमेदवारा तर्फे दहावी-बारावी च्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम प्रभागामध्ये घेत असतात
आपला प्रभाग हेच आपला परिवार असून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच नागरिकांच्या सुखदुःखामध्ये निम्म्या रात्री ते धावत असतात असे एका ज्येष्ठ नागरिकांनी नाशिक जन्मातला बोलून दाखवले.
दामोदर अण्णा मानकर हे अपक्ष नगरसेवक असताना जवळजवळ शंभर कामे त्यांनी प्रभागात केली असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पक्षातर्फे इंदुमती अरुण भोये खोसकर यांची निशाणी घड्याळ आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे दामोदर अण्णा नारायण मानकर यांची निशाणी धनुष्यबाण आहे.

शिवसेना पुरस्कृत उमेदवार सुनिता न्यानेश्वर पिंगळे यांची निशाणी कपाट आहे तर प्रमोद देवराम पालवे यांची निशाणी धनुष्यबाण आहे.
येत्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक सहाच्या चारी उमेदवारांना मतदारांनी भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस व पुरस्कृत युतीच्या उमेदवारांनी मतदारांना केले आहे.



