*मराठा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
मैदानावर घाम गाळल्यानेच घडतात उत्तम क्रीडापटू : मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात* -----

*मराठा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
————————————-
*मैदानावर घाम गाळल्यानेच घडतात उत्तम क्रीडापटू : मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात*
*नाशिक जनमत :* खेळातून नेतृत्व कौशल्य, संघभावना, खिलाडूवृत्ती, शिस्त, संयम आणि पराभव पचवण्याची क्षमता निर्माण होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानावर घाम येईपर्यंत खेळ खेळले पाहिजे. क्रीडामुळे शारीरिक, भावनिक व बौद्धिक असा सर्वांगीण विकास घडून येतो, असे प्रतिपादन मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांनी केले.
मराठा हायस्कूल येथे ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ अत्यंत उत्साहात व क्रीडामय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या कलाशिक्षकांनी काढलेल्या आकर्षक व सुंदर फलक लेखनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सुरूवातीला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात उपस्थित होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक देविदास भारती, विजय पवार, प्रताप काळे, क्रीडा शिक्षक राजाराम पोटे, मंगल शिंदे, अनिल उगले, सुहास खर्डे, चंद्रकांत ढिकले, सुयश कुंभार्डे आणि शालेय क्रीडा मंत्री हितेश अमोल हांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इयत्ता ८ वी ‘ड’ ची विद्यार्थिनी आराध्या संतोष चौधरी हिने सूत्रसंचलन केले. विद्यार्थी मनोगतातून इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी मुद्रा सतिश धनवडे हिने क्रीडा दिनाचे महत्त्व व खेळांचे मानवी जीवनातील स्थान यावर विचार मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय क्रीडा विभाग व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. इयत्ता ८ वी ‘ड’ मधील विद्यार्थिनी तन्मयी नितीन चव्हाण हिने आभार मानले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते


