प्रभाग एकमध्ये साकारणार उत्तर महाराष्ट्रातील पहिली ‘ई-लर्निंग’ अभ्यासिका ७०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार बळ!
प्रभाग एकमध्ये साकारणार उत्तर महाराष्ट्रातील पहिली ‘ई-लर्निंग’ अभ्यासिका
७०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार बळ!

पंचवटी
प्रभाग क्रमांक एक मधील दिंडोरी रोड रस्त्यावरील निसर्ग नगर येथे साधारणता २ एकर जागेमध्ये चार हजार स्क्वेअर फुट बांधकाम असलेली पाच कोटी रुपये खर्चाची भव्य तीन मजली उत्तर महाराष्ट्रातील पहिली ‘ई-लर्निंग’ अभ्यासिकेचे काम पूर्णत्वास असून ७०० हून अधिक विद्यार्थी आसन व्यवस्था असलेली या अभ्यासिकेमुळे तरुण-तरुणींच्या स्वप्नांना बळ मिळणार असून यामुळे या प्रभागासह यालगतच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हक्काचे ठिकाणाची निर्मिती या निमित्ताने झाली आहे.
या अभ्यासिकेच्या आतील असलेली प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याचा प्रभाग क्रमांक एक मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे प्रयत्न आहे. यामुळे प्रभाग एकचे महत्त्व काही पटीने वाढणार आहे. यामुळे प्रभागातील, शहरातील व लगतच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पुढील उच्च शिक्षणाला चालना मिळणार असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
प्रभाग क्रमांक एकचे माजी नगरसेवक रंजना भानसी, अरुण पवार व गणेश गिते यांच्या नगरसेवक व स्थायी समिती सभापती कार्यकाळात पाठ पुरावा करून त्यांनी या कामास मंजूरी मिळवून त्यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक शहरातील व उत्तर महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक ‘ई-लर्निंग अभ्यासिका’ उभारण्यात आली आहे.
– अभ्यासिकेची वैशिष्ट्ये आणि सुविधा
– अत्यंत कल्पक रचना : विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, या उद्देशाने प्रख्यात वास्तू विशारदांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासिकेची अत्यंत कल्पकतेने याची रचना करण्यात आली आहे.
– भव्य आसन व्यवस्था : या अभ्यासिकेत एकाच वेळी ७०० हून अधिक अभ्यास करू शकतील. इतकी मोठी रचना करण्यात आली आहे.
– शांत आणि स्वच्छ वातावरण : शहराच्या कलकलाटापासून दूर, अत्यंत शांत, स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठिकाणी याची निर्मिती करण्यात आली आहे.
– ई-लर्निंग सुविधा : डिजिटल युगाची गरज ओळखून येथे इंटरनेट आणि ई-लर्निंगची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन लेक्चर्स आणि संदर्भ साहित्य मिळवणे सोपे होणार आहे.
– सुरक्षितता आणि शिस्त : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि अभ्यासातील एकाग्रतेसाठी येथे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये अनेकदा जागेची टंचाई भासते. ही अडचण ओळखून आम्ही या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. या अभ्यासिकांमुळे प्रभागातील आणि परिसरातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.
प्रभागातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपले भविष्य घडवण्यासाठी उत्तम सोयी, सुविधा मिळाव्यात, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून उद्याचे आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि उच्चपदस्थ अधिकारी घडावेत, हीच आमची इच्छा आहे. त्यादृष्टीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आधारवड’ ठरावी अशी याची निर्मिती करण्यात आली आहे.
— गणेश बबनराव गीते (मा. स्थायी समिती सभापती, नाशिक)

प्रतिक्रिया
या अभ्यासिकेमुळे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर स्पर्धा परीक्षांसाठी लागणारा आत्मविश्वासही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सुव्यवस्थित आसन व्यवस्था आणि अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी मिळणारी पोषक जागा यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. नाशिक शहराच्या शैक्षणिक शिरपेचात हा एक मानाचा तुरा मानला जात आहे.
स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले असून, गणेश गीते यांच्या या दूरदृष्टीचे आम्हाला सर्वांना खूप कौतुक आहे.