महानगरपालिका निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात. ही निवडणूक ठरते मतदारांसाठी मतदानासाठी पैशाचा भंडारा.
नासिक जनमत प्रतिनिधी पुढील वर्षी कुंभमेळा होत असून नाशिकमध्ये होत असलेल्या नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे.
पस्तीस तास प्रचाराला आहेत. या वेळेची निवडणूक कुंभमेळ्यामुळे चर्चेत आलेले आहे. अनेक उमेदवारांनी मोकळा हात ठेवल्याने अनेक प्रभागात पैशांचा पावसाचा भंडारा जुना होणार आहे. लक्ष्मी दर्शनास अनेक प्रभागात मतदारांच्या चिठ्ठ्यांबरोबर लक्ष्मी दर्शन होत असल्याचे अनेक भागात बोलले जात आहे.
रात्र आणि दिवस सध्या उमेदवारांना झोप नसून उमेदवारांना नगरसेवक झाल्याची स्वप्न पडू लागली आहे या वेळेची निवडणूक काही मतदारांसाठी निवडणूक उत्सव ही दिवाळी ठरत आहे.
लोकशाही राज्यांमध्ये पैसा हेच मतदान करत आहे यात काही मतदार आपवाद ठरत नाही. परंतु सध्या सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी दर्शन होत असल्याचे चर्चा रंगली आहे.
नागरिक गेल्या पाच सहा वर्षात नागरिकांना मतदारांना आलेल्या समस्या लक्ष्मीदर्शनामुळे विसरत आहे. येणाऱ्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण निकाल हा लागणार असून नाशिकचे नवे कारभारी नवे महापूर लवकरच सत्तेवर बसणार आहे. त्यासाठी गेल्या तीन वर्षापासून नाशिक महानगरपालिकेतील महासभेचे सभागृह स्टॅंडिंग ऑफिस सर्वांची साफसफाई स्वच्छता चालू झालेले आहे. पंधरा दिवस जवळपास सत्तेचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता लागणार आहे.

दरम्यान ही नाशिक महानगरपालिका निवडणूक उमेदवारांसाठी पैशाचा पाऊस भंडारा ठरत आहे.
मतदार जागृत झाला असता तरी काही मतदार पैसा वर मतदान करणार का असा या लोकशाही राज्यामध्ये प्रश्न पडला आहे



