प्रेम संबंधात आला संशय. मित्राच्या मदतीने सिनेस्टाईल केली प्रियसीची हत्या.
कारमधून आणला मृतदेह; संशयितासह मित्राला अटक

नाशिक जन्मत दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या सारूळ येथे सापडलेल्या युवतीच्या प्रेताचे गुड उकळण्यात पोलिसांना यश आले आहे
संशयातून हत्याकांड झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे
मृत झालेली संस्कृती व अथर्व यांची कौटुंबिक संबंध होते त्यातूनच त्यांचे प्रेम संबंध जमले संस्कृती ही अकोला येथील विद्यापीठात शिक्षण घेत होते. अथर्व याने अकोला येथे जाऊन संस्कृतीला नाशिक येथे आणत असताना गाडीमध्ये दोघांचे खटके उडत होते अथर्वने चाकूच्या साह्याने संस्कृतीची हत्या केली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ती मरण पावली. याबाबत अधिक माहिती अशी की
कौटुंबिक मैत्रीतून प्रेमसंबंध निर्माण झालेल्या प्रेयसीवर संशय घेत तरुणाने तिच्या गळ्यात चाकू खुपसत हल्ला केल्यानंतर तिचा मृतदेह कारमध्ये नाशिकच्या बुलढाण्याहून सातपूरमध्ये आणि तेथून सारूळमध्ये नेऊन फेकून दिल्याचे सिनेस्टाइल हत्याकांड उघड झाले. याप्रकरणी अथर्व गजानन देशमुख (वय २१, रा. हनुमान गल्ली, सिंदखेड राजा, बुलढाणा) या मुख्य संशयितासह त्याचा मित्र संशयित सुमित देवानंद सानप (रा. बुलढाणा) याला पोलिसांनी अटक केली.
वाडीवहे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सारूळ येथील मोकळ्या जागेत शुक्रवारी (दि. २०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर
कारमधून आणला मृतदेह; संशयितासह मित्राला अटक
आणि वाडीवऱ्हेचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकांनी तातडीने तपास सुरू केला. राज्यभरातील पोलिस नियंत्रण कक्षात मृतदेहाचे फोटो पाठवून ओळख पटविण्याची कार्यवाही सुरू झाली. तेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील अकोला येथील संस्कृती सतीश काळे (वय १६, रा. सिंदखेड राजा) हिचा हा मृतदेह असल्याचे उघड झाले. वाडीवहे, शहरातील सातपूर व भद्रकाली पोलिसांनी

एकत्रित संशयितांचा शोध घेतला. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे, अंमलदार दीपक खरपडे, राहुल खांडबहाले, अमोल मोरे यांच्यासह वाडीव-हे पोलिसांनी संशयितांना सातपूर हद्दीतून अटक केली,



