प्रभाग 12 मध्ये भाजपा उमेदवारांची प्रचारात मुसंडी: प्रभागात भाजपमय वातावरण.
नाशिक- जनमत नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे सर्वच पक्षाचे राजकीय नेते सध्या नाशिक मध्ये सभा घेत असून सर्वांना मतदार गर्दी करत आहे . भाजपचा बाल किल्ल्ला समजल्या जाणा-या प्रभाग 12 मध्ये भाजपाच्या सर्व उमेदवारांनी प्रचारात मुसंडी मारल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या उरात धडकी भरल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात आज देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री यांची सभा झाली. आणि आणि सर्वत्र भाजपने वातावरण झाले आहे भाजपाची निशाणी असलेले झेंडे,उमेदवाराचे कटआउटस आणि प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 12 संपूर्ण परिसर भाजपामय बनल्याचे चित्र दिसत आहे. मतदार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघता महानगरपालिकेवर यावेळी सुद्धा भाजपाची एक हाती सत्ता येईल अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाचे उमेदवार शिवाजी गांगुर्डे. राजेंद्र आहेर. वर्षा येवले.आणि नुपूर सावजी.यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह समर्थ नगर महात्मा नगर आणि पारिजातनगर परिसराचा दौरा करून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या व हा संपूर्ण परिसर पिंजून काढला. भाजपचे हे सर्व उमेदवार उच्चशिक्षित, आहेत. शिवाजी गांगुर्डे यांनी पाच वेळेस नगरसेवक पद नाशिक महानगरपालिका सभापती विविध पदावर काम पाहिले आहे. गेल्या पाच टर्म मध्ये मोठ्या प्रमाणात प्रभागात विकासाचे काम केले आहे. त्यामुळे विकासाची गंगा प्रभागात आली आहे. उमेदवार हे विविध क्षेत्रातील मान्यवर असल्याने विविध कल्पक योजना ते मतदारांपुढे मांडत असल्याने मतदारांना उमेदवारांचा हा उपक्रम चांगलाच भावला आहे. मतदारसुद्धा प्रभागात कोणत्या योजना राबवाव्यात हे संवादा द्वारे उमेदवारांना सांगत असल्याने ही संवाद प्रक्रिया अत्यंत प्रभावी ठरत आहे. या प्रभागात बुद्धिजीवी लोकांचा भरणा अधिक असून या सर्वांनी भाजपाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रभागातील नागरिकांनी जनमत कडे बोलून दाखवले. विविध संघटना तसेच गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांनी भाजपाला निवडून देण्याचा निश्चय उमेदवारांशी संवाद साधताना व्यक्त केला.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. लाडकी बहिण योजनेमुळे महिला वर्ग खुश आहे आणि त्यामुळेच भाजपा शिवाय ते दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे भाजपच करू शकतो असे भाजपाच्या मान्यवर नेत्यांनी सांगितले. प्रभाग 12 मध्ये भारतीय जनता पक्ष चे चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.