प्रभाग एकमध्ये भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येतील – आमदार चित्रा वाघ नाशिक मनपावरही भाजपचीच सत्ता येणार असल्याचे संकेत
प्रभाग एकमध्ये भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येतील – आमदार चित्रा वाघ
नाशिक मनपावरही भाजपचीच सत्ता येणार असल्याचे संकेत.
नाशिक जनमत प्रतिनिधी पंचवटी
प्रभाग एकमध्ये भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येतील तसेच नाशिक महानगर पालिकेवरही भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असल्याचे संकेत भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष व आमदार चित्रा वाघ यांनी सांगितले. प्रभाग एक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या वतीने प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शुक्रवार, (दि ०९) रोजी असून रॅलीची सुरवात आरटीओ कॉर्नर येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. पुढे ओंकार बंगला, ए टी पवार आश्रमशाळा, केतकी सोसायटी, वडाचे झाड, म्हसरूळ चौफुली, भाजी मंडई, जिजामाता चौक, बालाजी चौक, ममता स्वीट्स, राजमाता मंगल कार्यालय, मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार रूपाली स्वप्निल ननावरे, रंजना पोपटराव भानसी, दिपाली गणेश गीते, अरुण बाबुराव पवार यांसह अशोक जाधव, विलास हटकर, वंदना भोसले, शितल कासलीवाल, रोहिणी दळवी, सविता गावित, सतीश वावीकर, मनोज बाग, आर डी कुलकर्णी, सिताराम पवार, श्याम धनगर व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग एकच्या उमेदवारांचे प्रचारार्थ आयोजित बाईक रॅलीला आमदार चित्रा वाघ यांची उपस्थिती असल्याने मतदारांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ठीक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी करून व महिलांकडून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी केलेली गर्दी पाहता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला.