प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिंदे गट शिवसेना विजयी होणार. प्रभागात येणार विकासाची गंगा.
नासिक जनमत प्रतिनिधी नाशिक महानगरपालिका निवडणुका चालू असून प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिंदे सेना गटाचे उमेदवार भागवत आरोटे नयना जाधव इंगोले हर्षदा गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून. प्रभागातील शिवशक्ती चौक खुटवडनगर अंबड लिंक रोड केवल पार्क इत्यादी परिसरामध्ये मतदारांतर्फे मोठा पाठिंबा मिळत असून यावेळी फक्त शिवसेना शिंदे गट विजय होणार असे मतदार बोलत आहे.
सध्या प्रचार गाडीसह चौक सभा मोठ्या प्रमाणात होत असून मतदारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे

प्रभागातील समस्या उमेदवार जाणून घेत आहे. व ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे उमेदवार सांगत आहे. ग्रह खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी आणणार असल्याचे उमेदवारा तर्फे आश्वासन दिले जात आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठे रुग्णालय प्रभागात आणणार आहे. ग्रीन जिम तसेच उद्याने याकडे प्रामुख्याने उमेदवारांची लक्ष राहणार आहे. प्रभागातील रस्ते खड्डे ड्रेनेज लाईन हे देखील नागरिकांसाठी चांगल्या स्थितीत राहतील असे आश्वासन उमेदवारांनी मतदारान दिले. प्रभाग क्रमांक 26 मधील चारी उमेदवार सुशिक्षित व प्रभागातील प्रत्येक भागातील त्यांना माहिती असल्याने प्रभागाचा विकास नक्कीच करतील अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. प्रभाग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी केवल पार्क भागात पोलीस चौकी बसवणे व प्रभागात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही बसवणार असल्याचेही यावेळी उमेदवारांनी बोलून दाखवले.
मतदारांचा उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने येणाऱ्या 15 तारखेला धनुष्य बान निशाणीवर मग शिक्का मारून मोठ्या मतांनी विजयी करावे असे आवाहन उमेदवारांतर्फे करण्यात आले आहे. प्रभागातील चारी उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी महानगरपालिकेत स्टॅंडिंग मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरून प्रभागातील कामे लवकरात लवकर करून घेण्यासाठी सज्ज व तत्पर असल्याचे मतदारांमध्ये बोलल्या जात आहे. यामुळे चारी उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत त्यांचा विजय नक्की असल्याचे बोलले जात आहे.




