बीसीसीआयच्या विजय हजारे ट्रॉफीत रामकृष्ण घोषचा अष्टपैलू धमाका
पंजाब विरुद्ध ३ बळी व फटकेबाज ७३

बीसीसीआयच्या विजय हजारे ट्रॉफीत
रामकृष्ण घोषचा अष्टपैलू धमाका
पंजाब विरुद्ध ३ बळी व फटकेबाज ७३

नाशिकचा जलदगती गोलंदाज-अष्टपैलू रामकृष्ण घोषने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पहिल्याच साखळी सामन्यात पंजाब विरुद्ध धडाकेबाज अष्टपैलू कामगिरीने आपला ठसा उमटवला. पंजाबचे तीन गडी बाद करन नंतर महाराष्ट्र संघातर्फे ७३ ही डावातील सर्वाधिक धाव संख्या नोंदवली.
प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्त्वाची विजय हजारे ट्रॉफी ही एकदिवसीय मर्यादित ५० षटकांची स्पर्धा, नियमितपणे दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात येते. त्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात २४ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान जयपूर येथे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होत आहेत.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३४७ धावा केल्या. त्यात रामकृष्ण घोषने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरा दाखल महाराष्ट्र संघाला ८ बाद २९६ इतकीच मजल मारता आली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत रामकृष्णने ३ षटकार व ५ चौकरांसह ७३ चेंडूत ७३ धावा फटकावल्या, यात अंकित बावणे बरोबर १०२ चेंडूत ८६ धावांची भागीदारी केली. पृथ्वी शॉ ४६ व अंकित बावणे ४५ वगळता बाकी फलंदाज विशेष कामगिरी न करू शकल्याने पंजाबने ५१ धावांनी विजय मिळवला.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाचे बाकी साखळी सामने पुढीलप्रमाणे – २६ डिसेंबर – सिक्कीम , २९ डिसेंबर – हिमाचल प्रदेश , ३१ डिसेंबर – उत्तराखंड , ३ जानेवारी – मुंबई , ६ जानेवारी – छत्तीसगड व ८ जानेवारी-