भोसला मिलिटरी स्कूल परिसरात कॅमेरात आढळली रान माजर. वन विभागातर्फे शोध मोहीम चालू.
नाशिक जन्मत काल सकाळी दहा वाजता भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात सेक्युरिटी गार्डने एक बिबट्यासारखे दिसणारे रान मांजर बघितले होते. परंतु जणू बिबट्याचे पिल्ले असल्यासारखे ते असल्याने भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारामध्ये व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळेच्या आवारात बिबट्या असल्याची बातमी वेगाने पसरली होती. दरम्यान वन विभागाची रेस्क्यू टीम देखील घटनास्थळावर हजर झाली होती विद्यार्थ्यांची सुरक्षा बघतात शाळेला काल आणि आज देखील सुट्टी दिली होती. दरम्यान परिसरामध्ये वनविभागातर्फे काल कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच पिंजरे देखील लावण्यात आले होते.

आज सकाळी वन विभागाने कॅमेऱ्याची तपासणी केली असता एका कॅमेरामध्ये रान मांजर आढळून आले आहे. असे वन विभागाचे अधिकारी कुशल पावरा यांनी सांगितले आहे..
तरीदेखील आज भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरामध्ये वन विभागातर्फे सर्च ऑपरेशन शोध मोहीम वाढलेले गवत व झाडी झुडपामध्ये बिबट्याचा शोध घेतल्या जात आहे.
विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. कारण भोसला मिलिटरी पासून जवळ असलेल्या कामगार नगर पारिजात नगर या भागांमध्ये तीन-चार दिवसांपूर्वी बिबट्या मिळून आला होता व त्याने नऊ जणांना जखमी देखील केले होते.
दरम्यान सेक्युरिटी गार्ड यांनी सांगितल्याप्रमाणे बिबट्याचे पिल्लू सारखे रान मांजर मिळून आलेले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.