ब्रेकिंग

मालेगाव मध्ये पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त.

मालेगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

 

 

 

 

बनावट (नकली) चलनी नोटा धडक कारवाई

 

मा.श्री.बाळासाहेब पाटील सो पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये तसेच मा.श्री. तेगबीरसिंह संधु सो, अपर पोलीस अधिक्षक, मालेगाव यांचे मार्गदर्शनाखाली व मा. श्री. दर्शन दुगड सो, सहा. पोलीस अधिक्षक मालेगाव कॅम्प उपविभाग यांचे नेतृत्त्वाखाली, मा.श्री.बाळासाहेब पाटील सो पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांना मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन हददीत तांबा काटा परिसरात दोन इसम हे बनावट (नकली) नोटा घेवुन विक्री करण्याचे उद्देदशाने फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने, सदर बातमीची खात्री करुन सदर इसमांवर योग्यती कायदेशीर कारवाई करणेकामी आदेश झाल्याने पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन यांनी तात्काळ मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन कडील तपास पथक तयार करुन तपास पथकास मिळालेली बातमी सांगुन, बातमीप्रमाणे खात्री करुन कायदेशीर कारवाईकामी रवाना केले असता, तपास पथकाने तांबा काटा परिसर तसेच शास्त्री चौक मालेगाव येथे सापळा रचुन खात्री केली असता, तांबा काटा जवळील वैष्णवी इलेक्ट्रीक दुकानाचे समोर रोडवर मालेगाव येथे दोन इसम हे संशयीतरित्या फिरतांना दिसले त्यावेळी तपास पथकाने त्यांचेवर छापा कारवाई करुन त्यांना जागीच पकडले आणि त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) धनराज नारायण धोटे वय 20 रा.मु.पो. कानगाव ता. हिंगनघाट जि. वर्धा 2) राहुल कृष्णराव आंबटकर वय 25 रा. कारला चौक सावजीनगर जि. वर्धा असे असल्याची सांगितल्याने त्यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात असलेल्या बॅगमध्ये एकूण 5,43,500/- रुपयाच्या हुबेहुब 500/- रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा सारख्या दिसणा-या एकुण 1087 बनावट (नकली) नोटा मिळून आल्याने त्यांना ताब्यात

 

 

 

 

 

 

घेतले असुन, त्यांचेविरुध्द मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन गु.र.नं. 192/2025 BNS 179,180,3(5) प्रमाणे दिनांक 15/11/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हयात आरोपी नामे 1) धनराज नारायण धोटे वय 20 रा.मु.पो. कानगाव ता. हिंगनघाट जि. वर्धा 2) राहुल कृष्णराव आंबटकर वय 25 रा. कारला चौक सावजीनगर जि. वर्धा यांना दिनांक 15/11/2025 रोजी यांना अटक करण्यात आली आहे.

 

सदरची कारवाई ही मा. श्री. बाळासाहेब पाटील पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये तसेच मा.श्री. तेगबीरसिंह संधु, अपर पोलीस अधिक्षक, मालेगाव यांचे मार्गदर्शनाखाली व मा.श्री. दर्शन दुगड सहा. पोलीस अधिक्षक मालेगाव कॅम्प उपविभाग यांचे नेतृत्त्वाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. भुषण चव्हाण, चा.पो.हवा. 1199 सचिन चव्हाण, पो. कॉ.125 पंकज भोये पो.ना.915 आनंद चव्हाण, पो.कॉ.3101 विशाल तावडे यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली आहे

 

1

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे