नासिक मध्ये घरात लपला बिबट्या. सात जण जखमी.
तीन तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश.

संग्रहित दृश्य
नासिक जनमत नाशिक शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. दरम्यान जागा स्थलांतर करणे व शिकाराच्या शोधामध्ये बिबट्या अनेकदा नाशिक शहरात आलेला आहे. जय भवानी रोड गंगापूर रोड इत्यादी भागांमध्ये बिबट्याचे मागील काही वर्षांमध्ये दर्शन झाले व त्याला पकडण्यात यश देखील आलेले आहे.
दरम्यान काल गंगापूर रोडवरील मध्यवस्तीत वनविहार कॉलनी व कामगार नगर भागामध्ये बिबट्याने पाच तास धुमाकूळ घातला. बिबट्याला बघण्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन यामुळे बिबट्या गोंधळाला व सैरावर पळू लागला. यामध्ये त्याने अनेक नागरिक यांच्यावर हल्ला केला यात सात जण जखमी झालेले आहेत वन विभागाचे कर्मचारी देखील यात जखमी झाले.
तीन तासाच्या आर्थिक प्रयत्नानंतर बिबट्याला डॉट मारून ताब्यात घेतले. दुपारी बारा वाजता बिबट्याचे कबीर नगर भागात असलेल्या पाठाच्या परिसरात दर्शन झाले. दुपारी अडीच वाजता पारिजात नगरच्या जेम्स स्कूल परिसरामध्ये बिबट्या आला. या भागामध्ये त्याने शारदा साबळे या महिलेवर हल्ला केला त्यांच्या हाताला जखम देखील झाली.

दुपारी तीन वाजता वन वेअर कॉलनीतील महिला शोभा निकम यांच्या घरात बिबट्या शिरला शोभा निकम यांनी त्वरित घराजवळ त्यांच्या दुकानात सासूबाई व दोन लहान मुलांना वडून दरवाजा बंद केला बिबट्याने जवळपास अर्धा तास त्यांच्या घरात मुक्काम केला दुपारी साडेतीन वाजता वन कर्मचारी संतोष बोडके व पंचवटीतील राहुल देवरे यांच्यावर त्यांनी हल्ला केला त्यानंतर तो गुलमोहर कॉलनीतील सोसायटीतील तारा मंगल आपारमेंट मध्ये आला तेथे गनद्वारे इंजेक्शन मारल्यानंतर बिबट्या येथे लावलेल्या जाळीला भेदून इमारतीच्या पाठीमागे उडी घेतली व तेथे बेशुद्ध पडला. या घटनेनंतर नाशिककर मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहे. नाशिक शहरातील मखमलाबाद परिसर पंचवटी परिसर आडगाव परिसर या परिसरात देखील बिबटे दर्शन देत असल्याचे सर्व चित्र आहे.

बिबट्याला प्रत्यक्ष बघितल्याने अनेकांचा थरकाप यावेळेस उडाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून बिबट्याला जर बंद केल्याने नागरिकांनी वन विभागाचे कौतुक केले.
गिरीश महाजन यांनी स्वतः या रेस्क्यूमध्ये भाग घेतला. व प्रत्यक्ष कृपया पकडण्यास मदत देखील केली.
जखमींमध्ये किशन लोहार. बबन शिंदे. व महिला शारदा साबळे जखमी झाले आहेत. नागरिकांनी कोणते अफवानुसार ठेवू नये. आपली काळजी घ्यावी. असे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.