वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिरमध्ये कर्मवीर डी. आर. भोसले यांना आदरांजली*
*वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिरमध्ये कर्मवीर डी. आर. भोसले यांना आदरांजली*

*नाशिक :* मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वाघ गुरुची बाल शिक्षण मंदिर शाळेत मविप्र समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर डी.आर.भोसले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. व्यासपीठावर मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे व ज्येष्ठ शिक्षिका कल्पना पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे होत्या. अध्यक्षांच्या हस्ते कर्मवीर डी.आर.भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. पहिली ते चौथीतील काही विद्यार्थी कर्मवीर डी.आर.भोसले यांच्या वेशभूषेत आले होते. शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याने कर्मवीर डी.आर.भोसले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय मनोगतात पुष्पा लांडगे यांनी विद्यार्थ्यांना डी.आर.भोसले यांच्या कार्याची ओळख आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कला शिक्षिका तारामती बोनाटे यांनी फलक लेखन केले होते. उपशिक्षिका मनीषा जाधव यांनी कर्मवीरांविषयीं माहिती सांगितली. उपशिक्षिका वर्षा ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.