प्रभाग क्रमांक सहा होणार विकासाचा बालकिल्ला.
प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार प्रभागात आणणार विकासाची गंगा.
” नासिक जनमत प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेचे रणधुमाळी अंतिम टप्प्यात आले असून फक्त 48 तास प्रचारास बाकी आहेत. प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत युतीचे उमेदवार श्री दामोदर अण्णा मानकर इंदुमती अरुण भोये सुनिता ताई न्यानेश्वर पिंगळे व श्री प्रमोद बापू देवराम पालवे यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून प्राचार्य चौक सभा ला मतदारांची मोठी गर्दी होत आहे.
प्रभागातील रस्ते वीज पाणी आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे असे उमेदवारांकडून मतदारांना आश्वासने दिले जात आहे नक्कीच करू. आपल्या समस्येसाठी केव्हाही फोन करा आम्ही ते नक्की सोडवणार. चारी उमेदवारांना सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्राचा अभ्यास असून स्वच्छ चरित्राचे उमेदवार असून त्यांना प्रभागात विकासाची गंगा आणण्यासाठी भरघोस मतांनी निवडून देऊ असे मतदान मध्ये बोलले जात आहे.
दामोदर मानकर प्रमोद पालवे व दोघी महिला उमेदवारांनी प्रभागांमध्ये कोणती सत्ता नसताना फक्त जनतेसाठी रुग्णवाहिका वैकुंठरध नवरात्र उत्सव गणपती उत्सव व अनेक संस्कृत कार्यक्रम प्रभागात उपलब्ध करून दिलेले आहेत. नागरिकांना उपचारासाठी लांब जावे लागत असल्याने प्रभागात महानगरपालिकेचे शासकीय रुग्णालय उपलब्ध करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे. प्रभाग क्रमांक सहा मध्ये येणाऱ्या 15 तारखेस प्रभागात विकासाची गंगा आणण्यासाठी आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन उमेदवारांनी मतदारांना केले आहे.



