ब्रेकिंग

भर पावसात आयुक्तांची मखमलाबाद व कार्बन नाका परिसरात प्रत्यक्ष पाहणी; पाणी साचण्याच्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश 

  1. भर पावसात आयुक्तांची मखमलाबाद व कार्बन नाका” परिसरात प्रत्यक्ष पाहणी; पाणी साचण्याच्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

नाशिक जनमत    मखमला बाद परिसरामध्ये वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.: शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आज प्रभाग क्रमांक ६ मधील मखमलाबाद आणि कार्बन नाका

 

 

परिसराची भर पावसात प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध संवेदनशील भागांची पाहणी करत पावसाळी व्यवस्थेचा आढावा घेत असलेल्या आयुक्तांनी आज पाणी साचणाऱ्या ठिकाणी थेट भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

मखमलाबाद परिसर आणि कार्बन नाका परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयुक्तांनी पावसातच परिसरात पायी फिरून जलनिस्सारण व्यवस्थेची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पाणी साचण्याची कारणे समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

यावेळी गाळ, माती आणि इतर अडथळे त्वरित हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात अशा समस्या पुन्हा निर्माण होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचे नियोजन करण्याबाबतही संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले. पाहणीवेळी प्रभाग समिती सभापती रोहिणी पिंगळे आणि नगरसेवक वाळू काकड व इतर पदाधिकारी यांनीही उपस्थित राहून परिसरातील परिस्थितीची माहिती दिली.

 

 

 

यावेळी आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या, “पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करणे ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. समस्या समोर आल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही होणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे यावर महापालिका प्रशासनाचा भर आहे. प्रत्येक संबंधित विभागाने समन्वयाने काम करून नागरिकांना त्वरित दिलासा मिळेल, याची दक्षता घ्यावी.”

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे