ब्रेकिंग

क्रेडीई च्या प्रॉपर्टी एक्सप्रो मध्ये नाशिककरांना 43 मधल्या च्या उंच इमारतीच्या आकर्षण

नासिक  नाशिक शहरात सध्या तारीख 14 ते 18 पर्यंत क्रेडितर्फे प्रॉपर्टी एक्सपो ठक्कर डोम येथील ग्राउंड वर भरला असून पुणे नाशिक मुंबई येथून नागरिक व्यावसायिक नाशिक मध्ये हा एक्सपो येत आहे.    प्रॉपर्टी एक्सपो ची धूम असून प्रदर्शनात शहरातील १२.५१ कोटींचा फ्लॅट आणि मुंबई वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील सर्वांत उंच मजली इमारत आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. येथे अगदी १९५ लाखांपासून फ्लॅटस् उपलब्ध असून तीन दिवसांत चाळीसवर फ्लॅटस्चे स्पॉट बुकिंगही झाले आहे. यामुळे येत्या काळात आर्थिक उलाढालीला सुरूवात झाली आहे. शहराच्या आर्थिक विकासाला बूस्टर देणारे हे प्रदर्शन

 

 

 

ठरणार आहे. दरम्यान प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे. ठक्कर डोम येथे हे प्रदर्शन सुरू आहे. एक आणि दोन मजली टुमदार घरांचे नाशिक आता उंच उंच इमारती तसेच टाऊनशिपचे शहर होत आहे. यामध्ये विविध सोयी सुविधा देखील बांधकाम व्यावसायिक देत आहेत. १४ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा १८ ऑगस्ट रोजी समारोप होणार असून एका छताखाली असलेल्या ५०० पेक्षा अधिक पर्यायातून निवड करण्यासाठी आजच प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन प्रदर्शनाचे समन्वयक नंदकुमार कुलकर्णी यांनी केले आहे. प्रदर्शन स्थळी स्पॉट बुकिंग करणाऱ्यांना चांदीचा शिक्का भेट म्हणून देण्यात येत आहे. सोमवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त माणिक गुरसळ उपस्थित असतील. आज शेवटचा दिवस असून नाशिककर मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टी एक्सपोला हजरी लावतील असा अंदाज आहे. तीन दिवसांमध्ये जवळपास 40 फ्लॅटचे बुकिंग झालेले आहे क्रीडेचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितले की क्रीडा नाशिक मेट्रो तर्फे येथील ठक्कर डॉन येथे आयोजित नम नाशिक प्रॉपर्टीचा महा कुंभ प्रदर्शनास मिळालेला प्रतिसाद नाशिकच्या अर्थकारणात नवं चैतन्य  आणणार आहे. नाशिककर नवीन स्वप्नांचा नवीन घर बँकेचे व्याजदर कमी झाल्याने खरेदी करणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे