ब्रेकिंग

मान्सून टास्क फोर्स’ची शहरभर धडक कारवाई जलनि:स्सारण, रस्तेदुरुस्ती आणि स्वच्छतेच्या कामांसह ₹४९,१८० दंडाची वसुली.

‘मान्सून टास्क फोर्स’ची शहरभर धडक कारवाई

जलनि:स्सारण, रस्तेदुरुस्ती आणि स्वच्छतेच्या कामांसह ₹४९,१८० दंडाची वसुली

 

नाशिक :जनमत  पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नागरी अडचणींवर तातडीने उपाययोजना करत नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासनाने आयुक्त मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली ‘मान्सून टास्क फोर्स’ मोहिमेअंतर्गत शनिवारी प्रभाग क्र. २४ सह शहरातील विविध भागांमध्ये धडक कारवाई केली. यामध्ये स्वच्छता, दुरुस्ती आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, मोहिमेत विविध प्रकरणांमध्ये एकूण ₹४९,१८० दंडाची वसुलीदेखील करण्यात आली.

महापौरा हिमगौरी आडके प्रभाग ७ मध्ये पाहणी दौरा केला; अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनीही प्रभाग ७ मधील कामांची पाहणी केली. मान्सून टास्क फोर्स मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या या कारवाईचा आढावा महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व प्रदीप चौधरी, नगरसेवक आणि विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून घेतला.

प्रभाग क्र. २४ मधील पखाल रोड परिसरात ‘मान्सून टास्क फोर्स’ने पावसाळी जलवाहिन्या आणि स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजची स्वच्छता, विविध विभागांच्या खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीची कामे, उद्यानांतील हिरव्या कचऱ्याची साफसफाई तसेच पाणीगळती दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. याशिवाय, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवरही याद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

 

मोहिमेअंतर्गत झालेली कारवाई…

एका बांधकाम व्यावसायिकाने स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजमध्ये काँक्रीट टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावर २०,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच विनापरवाना तीन टन डेब्रिज टाकल्याप्रकरणी संबंधितांकडून २४,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य टाकल्याप्रकरणी ५,००० रुपये आणि रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी १८० रुपये दंड आकारण्यात आला.

याचबरोबर प्रभाग क्र. १७ मधील जेलरोड परिसरात जलाराम किराणा दुकानाजवळ चेंबरमधील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. विश्वेश्वर महादेव मंदिरासमोरील शिवकृपा नगरातील श्री सप्तशृंगी निवास बंगल्याजवळील चोकअप काढण्यात आला. मंडलिक मळा, साईनगर येथील नाल्याजवळ दोन ढापे बसविण्यात आले. प्रभाग क्रमांक १५ मधील युनिटी टॉवर्स परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकावर रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणे आणि चेंबर परिसर अस्वच्छ ठेवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच गोविंदनगर परिसरातील पावसाळी चेंबरची होल्स मोकळी करण्यात आली आणि पाण्याचा गैरवापर तसेच प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

“पावसाळ्यात शहरातील नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी ‘मान्सून टास्क फोर्स’ ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. नाशिककरांनीदेखील पालिका प्रशासनाला सहकार्य करून आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे