ब्रेकिंग

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे* *‘स्वयंम’ योजना प्रवेश अर्जाची प्रक्रिया सुरू*

*इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे*

*‘स्वयंम’ योजना प्रवेश अर्जाची प्रक्रिया सुरू*

*नाशिक, दि. १७ ऑगस्ट नासिक जनमत  वृत्तसेवा)* : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती सहायक संचालक संतोष चव्हाण यांनी दिली आहे.

 

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयंम’ योजनेतंर्गत बारावीनंतर व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेतंर्गत गुणवत्तेच्या आधारे मोफत प्रवेश दिला जाणार आहे. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश देय राहील. ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे, त्याच पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील. उर्वरीत सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील.

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयंम’ योजनेचे प्रवेश अर्ज सुरु करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरिता सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याकरिता https://hmasnew.mahait.org/ पोर्टलवर टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

या योजनेचा अर्ज वरील दिलेल्या संकेतस्थळावर भरून अर्जाची एक प्रत सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक- पुणे रोड, नाशिक या कार्यालयात जमा करावी, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे