व्यवसायिकास मारहाण करणाऱ्या तिघांना न्यायालयाकडून पोलीस कोठडी.

नाशिक एका व्यवसायिका सह तीन जणांनी मुंबई नाका परिसरात एका हॉटेल जवळ मारहाण केली होती तसेच भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना देखील मारहाण करून दहशत निर्माण केली होती. यानंतर महाराज झालेल्या व्यवसाय ललित कोल्हे ने मुंबई नाका पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलजवळ रात्री एका व्यावसायिकास बेदम मारहाण करून याची सोनसाखळी आणि रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांनाही संशयितांनी मारहाण केली. या प्रकरणी मुंबई नाका पो लिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून चोघांपैकी तिघांना अटक केली असून, त्यांना पोलिस कोठडी दिली आहे.
अरबाज बागवान, सोहिल पठाण, म्रान शेख अशी संशयितांची नावे आहे.
कर्यादी ललित राजेंद्र कोल्हे (वय २५, -. आव्हाड चौक, चेतनानगर) हे रात्री १.३० ते ११.४५ च्या सुमारास रसायकलने द्वारका येथून
राणेनगरकडे जात होते. प्रवासादरम्यान ते एका हॉटेलजवळ थांबले असता, तोंडाला रुमाल बांधलेले चार अनोळखी संशयित त्यांच्याजवळ आले. या चौघांनी कोल्हे यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने ललित यांच्या पोटावर जोरदार लाथ मारली, ज्यामुळे ते खाली कोसळले. या हल्ल्यात त्यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली असून, मनका फॅक्चर झाला आहे. ते खाली पडल्यानंतर संशयितांनी त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. पाकिटातील १४ ते १५ हजार रुपये आणि पँटच्या डाव्या खिशातील ३० हजार रुपये अशी एकूण ४५ हजार रुपयांची रोकड
बळजबरीने लुटली. दरम्यान, झटापटीदरम्यान ललित यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची साखळी तुटली, तीदेखील संशयितांनी पळवून नेली. याचवेळी ललित यांना चाकू व सुऱ्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पाहून घटनास्थळी काही नागरिक ललित यांच्या मदतीसाठी धावले. मात्र, या गुंडांनी त्यांनाही बेदम मारहाण केली. या गंभीर घटनेनंतर ललित कोल्हे यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या सूचनेने सहाय्यक पोलस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्यासह पथकाने कारवाई करत चौघांपैकी तिघा संशयितांना अटक केली आहे. चौघेही संशयित सराईत व बेरोजगार असून, चौथ्या पसार संशयितांचा शोध सुरू आहे.



