ब्रेकिंग

प्रेमसंबंधातून महिलेचा खून; अपघाताचा बनाव उघड कारची पाठीमागून धडक देत संपविले; संशयित अटकेत

प्रेम संबंधातून वाद. आणि खून.

प्रेमसंबंधातून महिलेचा खून; अपघाताचा बनाव उघड

कारची पाठीमागून धडक देत संपविले; संशयित अटकेत

 

 

 

नाशिक जन्मत   दोन दिवसापूर्वी विवाहित करून एक 34 वर्षे महिला इगतपुरी परिसरात हॉटेलमध्ये जेवणासाठी फिरण्यासाठी गेली होती. यावेळेस तिचा अपघाती मृत्यू झाला होता असं बनव करण्यात आला दरम्यान महिलांचा खून करण्यात आल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

वाडीव-हे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल-रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ ३४ वर्षीय रूपाली पाटील यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून झालेला खूनाचा प्रकार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या

रूपाली यांच्याशी वाद झाल्यानंतर संशयित दीपक सैंदाणे याने कारने पाठीमागून धडक देऊन त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

या प्रकरणी वाडीव-हे पोलिस ठाण्यात अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दीपक शिवाजी सैंदाणे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली नीलेश पाटील (३४, रा. एकदंतनगर, अंबड) या कंपनीच्या कामानिमित्त मित्र तथा प्रियकर दीपक सैंदाणे (४३, रा. अंबड) याच्यासोबत कारने वाडीव-हे परिसरात गेल्या होत्या. दोघे सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले. त्यापूर्वी कारमधून फिरत असताना दीपकने कारमध्येच मद्यपान केल्याची माहिती तपासात समोर आली आहे

रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे झटापटीत रूपांतर झाले. त्यानंतर रूपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकने कार पाठीमागून वेगाने नेत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर हा प्रकार प्रथमदर्शनी अपघात असल्याचे भासत होते. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपकला तत्काळ ताब्यात घेतले. कसून चौकशीत रूपाली आणि आपले मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे