ओझर येथे ट्रक चे चाक डोक्यावरून गेल्याने युवकाचा मृत्यू नाशिक मधील 9वि घटना.
नाशिक शहर असं महामार्गावर आतापर्यंत खड्ड्यामुळे नऊ बळी.

नाशिक जनमत एक तरुण मोटरसायकलून मागून गाडी गेली तरुण कामावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) अधिकाऱ्याचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. दुचाकी घसरल्यानंतर पाठीमागून आलेल्या अज्ञात अवजड वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने धनंजयकुमार ठाकूर (रा. ओझर टाऊनशिप) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत धनजंयकुमार अपघाताचे दृश्य ठाकूर इतके विचित्र होते की, मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनाही धक्का बसला. काही तरुणांनी धीर करून मृतदेह रुग्णवाहिकेतून मेडिकल कॉलेजमध्ये नेला; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, आतापर्यंत शहरासह महामार्गावर रस्ते कामाचे नऊ बळी गेले आहे.

मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजता हा अपघात झाला. ठाकूर हे नेहमीप्रमाणे मोपेडवरून (एमएच १५ एफजे ७२६८) ओझरकडून नाशिकच्या दिशेने येत होते.
गरवारे पॉईंटकडे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता बंद होता. त्यामुळे यू-टर्न घेऊन ते डिआरडीओकडे जात असताना आडगावच्या दिशेने अमृत पंजाब ढाब्यासमोर त्यांची दुचाकी स्लीप झाली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अवजड वाहनाखाली ते सापडले. हेल्मेट घातलेले असतानाही वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताने एका कुटुंबाचा आधार हिरावला असून, उड्डाणपुलाच्या संथ कामामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
घरातून बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी परत सुखरूप येईल का असा प्रश्न सध्या नाशिकमध्ये उपस्थित होत आहे.

