ब्रेकिंग

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार आणि वनश्री पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव* 

*मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार आणि वनश्री पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव*

नाशिक, दि. १७ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना जागा वाटप, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि ग्रामपंचायतीचा गौरव, मृद व जलसंधारण विभागाच्या वॉकेथॉन लोगोचे अनावरण आणि पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिप या संस्थेच्या नेतृत्वाखालील शिष्यवृत्ती समृद्धी योजनेचे अनावरण विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणनंतर हा कार्यक्रम झाला.

मौजे सौंदाणे, ता. मालेगांव, जि. नाशिक येथे ६१ भूमीहीन लाभार्थ्याना ५०० चौ. फूट प्रमाणे ३०५०० चौ. फूट जागा आणि मौजे बोपेगांव, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथे १४ भूमीहीन लाभार्थ्यांना ४०० चौ. फुट प्रमाणे ५६०० चौ. फुट जागा घरकुल बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचे वितरण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

 

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये सुशासन युक्त पंचायत ग्राम पंचायत निंबाळे, ता चांदवड, जि. नाशिक यांनी द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्याबद्दल ग्रामपंचात पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

 

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ शेखर जयंतराव गायकवाड( प्रथम पुरस्कार) आणि ग्रामपंचायत भोकणी, ता सिन्नर( प्रथम पुरस्कार) यांना जाहीर झाला होता. त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

 

मृद व जलसंधारण विभागाच्या वॉकेथॉन लोगोचे अनावरण आणि पिरॅमल फाऊंडेशन फॉर एज्युकेशन लिडरशिप या संस्थेच्या नेतृत्वाखालील शिष्यवृत्ती समृध्दी योजनेचे अनावरण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे