महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री मा.पंकजाताई मुंडे यांनी नाशिक महानगरपालिकेला सदिच्छा भेट .

महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री मा.पंकजाताई मुंडे यांनी नाशिक महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांचे स्नेहादरपूर्वक स्वागत केले.
नाशिक जनमत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांचा त्यांनी बैठकीत सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस उपमहापौर विलास अण्णा शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

नाशिक शहराच्या महापौर हिम गौरी आडके उपमहापौर विलास शिंदे नाशिक महानगरपालिकेचे स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांनी पंकजाताई मुंडे यांचा सत्कार केला. व विविध विषयावर चर्चा केली.
पर्यावरण स्वच्छता हरित नासिक पर्यावरण संरक्षण इत्यादी विचार चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
नाशिकच्या शाश्वत विकासासाठी, स्वच्छतेसाठी आणि भाविक-पर्यटकांच्या सुलभतेसाठी सदैव तत्पर आहोत!

