मुलाला नोकरी लागण्यासाठी आर्थिक फसवणूक करणाऱ्याच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या.
कठोर कारवाईची मागणी.
प्रतिनिधी |
नाशिक जन्मत वाढलेली बेरोजगारी. हा महत्वाचा सध्याचा विषय झाला आहे . उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी लागत नाही. त्यातच कुणीतरी सरकारी नोकरी लावण्याची लालच देतात. व पैशाची मागणी करतात अशा प्रकार मोठ्या प्रमाणात सध्या वाढलेला आहे. आपल्या मुलाला गव्हर्मेंट नोकरी लागावी. त्याचे जीवन चांगले व्हावे यासाठी वडील आई नेहमी प्रयत्न करत असतात. अशाच प्रवीण सोनवणे यांनी आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळावी यासाठी पैसे दिले परंतु पैसे वापस न दिल्याने काल सिडको मधील मामेभाव्याच्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लोकरीचे आम्हीच देणाऱ्याचे नाव सचिन बबनराव चिखले असे असल्याचे त्यांनी देऊन ठेवलेल्या चिठ्ठी मध्ये आहे.
‘मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून व्हॉट्सअपही केले आहे. हे पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये…’ अशी चिठ्ठी लिहून ठेवत शासकीय नोकरीच्या आमिषाने फसलेल्या एक तरुणाच्या वडिलांनी सिडकोत मामेभावाच्या घरी आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असतानाच तरुणांना नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या सचिन बबनराव चिखले याची ठगेगिरीही उघडकीस आली आहे, त्याच्यावर अंबड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि समाधान आहिरे (रा. निवाण, सटाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे मेहुणे प्रवीण बापू सोनवणे
(४९, रा. सटाणा) यांना त्यांच्या ओळखीचे सचिन चिखले (रा. नाशिकरोड) याने मुलास आणि इतर नातेवाइकांच्या मुलांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यापोटी वेळोवेळी सव्वा कोटी रुपयेही घेतले. मात्र नोकरीस लावून दिलेले नाही. चिखले याच्याकडे पैसे मागितले असता त्याने परतही दिले नाही. सोनवणे यांनी ज्या लोकांकडून उसने पैसे घेतले होते. ते लोक पैशांसाठी तगादा लावत असल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले होते. ते शुक्रवारी (दि. ११) सिडकोतील राजरत्ननगर येथे रहात असलेले नातेवाइक अनिकेत पवार यांच्या घरी मुक्कामी आले होते. मात्र, सायंकाळी साडेसात वाजता त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी चिखले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. अशा फसवणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. नोकरीचे आमिष दाखवून लुटणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे.