क्रेडाई प्रॉपर्टी 14 ते 18 ऑगस्ट..एक्स्पोत १५ लाख ते १० कोटींपर्यंत मालमत्ता
प्रदर्शन • १४ ते १८ पर्यंत आयोजन, यंदा उत्तर महाराष्ट्रासह कल्याण, ठाण्यातूनही घर खरेदीला येणार लोक
क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोत १५ लाख ते १० कोटींपर्यंत मालमत्ता
प्रतिनिधी । नाशिक जन्मत नासिकच्या वातावरण तसेच धार्मिक शहराकडून उद्योजकाचे शहर. मंत्रभूमी कडून यंत्र भूमीकडे वाट चालू करणाऱ्या शहरांमध्ये
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने ‘प्रॉपर्टीचा महाकुंभ’ या भव्य प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. ठक्कर डोम येथे १४ ते १८ ऑगस्ट या काळात होणाऱ्या या एक्स्पोमध्ये एकाच ठिकाणी १५ लाख ते १० कोटी रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या मालमत्ता उपलब्ध असतील.
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात ८० स्टॉल्सच्या माध्यमातून १०० विकसक (डेव्हलपर्स) फ्लॅट, प्लॉट, बंगलो, डुप्लेक्स, पेंट हाऊसेस, ऑफिस स्पेसेस आणि लेआऊट्स यांसारख्या मालमत्ता सादर करणार आहेत. यंदा केवळ उत्तर महाराष्ट्रातूनच नव्हे, तर कल्याण, डोंबिवली आणि ठाणे यांसारख्या शहरांमधून मोठ्या संख्येने ग्राहक
ठक्कर डोम येथे प्रॉपर्टी एक्सपोच्या भूमिपूजनप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे पदाधिकारी. समवेत मान्यवर.
येण्याची अपेक्षा आहे.
आगामी कुंभमेळ्यापूर्वी वाजवी दरात घर खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी मानली जात आहे. या एक्स्पोमधून किमान ५०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, समन्वयक नरेंद्र कुलकर्णी तसेच कृणाल पाटील, मनोज खिंवसरा यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे.
विमानसेवा, रेल्वे आणि रस्तेमार्गे शहराची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. यामुळे कुंभमेळ्यानंतर शहरातील रिअल इस्टेटचे दर वाढण्याची
शक्यता आहे.
(यावेळी समन्वयक ऋषिकेश कोते यांनी सांगितले की, औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक आणि कृषीपूरक उद्योगांमुळे नाशिकमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा नाशिककडे कल वाढत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये पुढील पाच महिन्यांत ५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.)
दिसून आले होते. त्यामुळे सध्याच्या दरात प्रॉपर्टी खरेदी करण्याची ही एक सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी.
उपाध्यक्ष उदय घुगे, अनील आहेर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.