रक्षाबंधनच्य आदल्या रात्री. बिबट्याने घेतला तीन वर्षाच्या बालकाचा जीव.
नाशिक जन्मत प्रतिनिधी नाशिक शहरापासून जवळ असलेल्या वडनेर दुमाला या ठिकाणी रात्री आठ वाजता घरापुढे खेळत असलेल्या तीन वर्षाच्या बालकास बिबट्याने उसात ओढून जीव घेतला. रक्षाबंधनच्या रात्री झालेल्या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. आयुष असे नाव असलेल्या तीन वर्षाचा बालक आपल्या वडिलांबरोबर अंगणात खेळत होता. वडील काही कामानिमित्त घरात गेल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने बालकास अलगद उचलून उसात नेले व जीवे ठार केले. वडिलांनी बालकास जेवणास घरातून आवाज दिल्यानंतर आवाज न आल्याने वडिलांचे पूर्ण परिवार घाबरला. काही दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्या फिरत असल्याने परिवाराचा संशय बिबट्यावर आला. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जवळपास तीन ते चार तास सर्व परिसर शोधून काढला.
रात्री बारा वाजता आयुष चा मृत्यू देह मिळून आला. आई-वडिलांचे पूर्ण परिवाराने हंबरडा फोडला. परिसरातील सर्वांचे डोळे यावेळेस पानावले होते. काल सकाळी आयुष्य ला अंत्यविधी साठी नेताना बहिण श्रेया ने आयुष्याच्या हातावर शेवटची राखी बांधली. यावेळेस सर्व नागरिक परिवार नि शब्द झाला होता.
या परिसरामध्ये आता तीन-तीन पिंजरे लावले जातील परंतु आयुष्य पुन्हा येणार नाही.
वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर आले होते. अगोदरच वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले असते तर अशी दुर्घटना झाली नसती असे नागरिक बोलत आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांमध्ये बिबट्याने चार जणांना ठार मारलेले आहे.. वन विभागाने बिबट्या पकडल्यानंतर लांब सोडणे महत्वाचे झाले आहे. जय भवानी रोड परिसरात देखील बिबट्या फिरत असून नाशिक शहरातील आडगाव मखमलाबाद जय भवानी रोड वडनेर दुमला मळे वस्तीतील नागरिक भयभीत झालेले आहे. रक्षाबंधनच्या दिवशी भावाचा अंत्यविधी करण्याची वेळ आल्याने लहानशी बहीण भावाच्या देहाला राखी बांधत असताना घटनास्थळावर असलेल्या महिला व नागरिक यांना शोक अनावर झाला होता. वन विभागाने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पिंजरे लावणे गरजेचे झालेले आहे. अशी घटना पुन्हा होऊ नये याची खबरदारी घ्यावी.