येवला व लासलगाव परिसरात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, घरफोडीचे ०६ गुन्हे उघडकीस आणण्यात यश

पोलीस अधीक्षक कार्यालय, न
येवला व लासलगाव परिसरात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, घरफोडीचे ०६ गुन्हे उघडकीस आणण्यात यश
नाशिक जनमत नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक सो. यांनी आढावा घेऊन सराईत गुन्हेगारांचे सध्याचे ठाव-ठिकाणाबाबत माहिती काढण्यास पोलीस पथकांना सूचना दिलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने येवला व लासलगाव परिसरात घडलेल्या घरफोडी गुन्ह्यांचे समांतर तपासात, घरफोड्यांवरून मिळून आलेले तांत्रिक व भौतिक पुराव्यांची अचूक पडताळणी करून मिळविलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खालील सराईत गुन्हेगारास ताब्यात घेतले.
१) शंकर शिवाजी पवार, वय ४५, रा. गुरुवखेडा, ता. येवला, जि. नाशिक
यातील ताब्यात घेतलेला वरील सराईत गुन्हेगार यास विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार नामे २) भाऊसाहेब उर्फ गाल्या सुभाष पवार, रा. तात्याबेडी, ता. निफाड, जि. नाशिक (फरार) याचेसह मिळून येवला व लासलगाव परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीने कबुली दिलेल्या घरफोडीचे
सहा ठिकाणी घरपोडी केले आहे.
यातील आरोपी नामे शंकर शिवाजी पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनला मालमत्तेविषयक गुन्हे दाखल आहेत. वरील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले आरोपीताला पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून पुढील तपास येवला शहर पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत. सध्या पावसाळा लावणीवर आल्याने येवला तालुक्यात सर्वत्र चोरांच्या अफवा पसरली आहे. राजापूर ममदापूर परिसरातील रात्री नागरिक जागे राहून पहारा देत असल्याचे सांगण्यात येत आहे नागरिकांमध्ये घाबरतट पसरले आहे.
(नाशिक जन् मत बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा )
नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व येवला शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने वरीलप्रमाणे घरफोडीचे ०६ गुन्हे उघडकीस आणून कारवाई केली आहे.



