ब्रेकिंग

गिरीश महाजन यांची मखमलाबाद रोडला भेट. खड्डे ताबडतोब भरण्याची अधिकाऱ्यांना तंबी.

महापौर हिंमगोरी आडके सह गणेश गीते नगरसेवकांची उपस्थिती यांची उपस्थिती.

नासिक जनमत  नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून नाशिक महानगरपालिका अधिकारी तसेच सत्ताधारी यांना जनतेचा आक्रोश संताप सहन करावा लागत आहे

 

कुंभमेळ्याच्या नावाखाली  रस्त्याच्या रुंदीकरण काँक्रिटीकरणासाठी शहरातील संपूर्ण रस्ते करून ठेवलेले आहेत. रिकामे अपुरे असतानाच पावसाळा चालू झाल्याने आत्तापर्यंत खड्ड्यात पडून पाच ते सहा जणांचे बळी गेलेले आहे. अनेक जण दवाखान्यात ऍडमिट आहेत.

दुचाकी चार चाकी वाहन दुरुस्त होऊन स्पेअर पार्ट खराब झालेत. अनेक दुचाकी चार चाकी खड्ड्यात आदळून  नागरिकांचे मणके कंबरडे खराब झालेले आहेत.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रखडल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे खोदलेल्या खड्ड्यातील माती रस्त्यावर आल्याने शहरातील मुख्य रस्ते कॉलनी रस्ते संपूर्ण चिखलाने माखलेले आहे. या रस्त्यावर दुचाकी घसरून पडत आहे.

 

 

 

नाशिक करायचा संताप बघता  कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन गेल्या चार दिवसापासून  नाशिक शहरात आहेत. काल नासिक महानगरपालिकेत त्यांनी भेट देऊन आयुक्त महापौरांची उपमहापौरांची भेट घेतली. सर अभियंता तसेच एम एन जी एल गॅस लाईन व ठेकेदारांना ताबडतोब आठ दिवसाच्या आत नाशिक शहर खड्डे मुक्त करण्याचे सांगितले. दरम्यान दोन दिवसापासून युद्ध पातळीवर रात्री 11 ते दोन वाजेपर्यंत रस्त्यावर कामे चालू आहे. अनेक ठिकाणी खड्डे बुजवली देखील आहेत. परंतु पुन्हा दहा पंधरा वीस मिनिटे पाऊस झाला की ही खड्डे पुन्हा पडत आहे. त्यामुळे कुंभमेळा मध्ये गिरीश महाजन यांनी आठ दिवसात नाशिक शहर खड्डे मुक्त करण्याचे ठरवले आहे. परंतु खड्डे बुजवण्याचे काम ठीक होत नसल्याने थोड्या पावसात पुन्हा खड्डे पडत आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे खड्डे बुजवण्यासाठी लागणारे कोट्यावधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे  नाशिक शहरातील विविध रस्त्यावर सध्या महापौर उपमहापौर कुंभमेळा मंत्री शहरातील विविध भागात भेट देत आहे. यावेळेस नासिक महानगरपालिका बांधकाम अधीक्षक अग्रवाल पगार सर व इत्यादी अधिकारी यांना कुंभमेळा मंत्री महापौर उपमहापौर सूचना देत असून. नागरिकांचा रोष पाहता खड्डे बुजवण्याचे   ही कामे लवकरात लवकर करण्याचे आदेश देताना दिसून येत आहे. आज मखमलाबाद रोडवरील ड्रीम केसल ते गाभने मळ्यापर्यंत  गिरीश महाजन यांनी रस्त्यावरून या भागाचा दौरा केला.

 

यावेळी अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्तीची बाबत  सूचना देण्यात आल्या. गेल्या अनेक दिवसापासून एकतर्फी रस्तेखाली असून त्याचे काम संतगतीने चालू असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात गिऱ्हाईक जात

 

 

नसल्याने दुकानदारांना फुकटच दुकानाचे भाडे भरावे लागत आहे. व्यवसाय धंदा बोलत असल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

 

 

लवकरात लवकर पाऊस उघडल्यानंतर ही कामे युद्ध पातळी होण्याची गरज निर्माण झाली आहे. मखमलाबाद प प्रभाग क्रमांक सहा मधील नगरसेवक वाळूबा काकड. प्रमोद पालवे. रोहिणी ताई पिंगळे. व तांदळे मॅडम इत्यादी यावेळेस उपस्थित होते. महादेव कॉलनी परिसरातील रस्ते देखील मोठ्या प्रमाणात खराब झाले असून. रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवून ही रस्ते डांबरीकरण काँक्रिटीकरण करणे जरुरी झालेले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे