तरुणांनी कृषी उद्योजकता निर्मिती मध्ये सहभागी होणे गरजेचे. प्रदीप पेशकर. भाजप उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष.

नाशिक जनमत “राज्यात फल उत्पादन वाढत असून ग्रामीण भागातील कृषी पूरक व्यवसायात वाढ होताना दिसत आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीमाल विक्रीच्या समस्या सुटण्यास मदत होत आहे शेतमाल विक्रीसाठी शासन प्रयत्न चालू आहे व शासनाची भूमिका सकारात्मक आहे ग्रामीण भागातील तरुणांनी कृषी उद्योजकता निर्मितीत सहभागी होणे गरजेचे झाले आहे असे प्रतिपादन भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी केल आहे.
कृषी भूषण महाराष्ट्र स्टार्टर ॲप्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऍग्रो कन्वेषण पुरस्कार वितरण सोहळ्यात पेशकर बोलत होते ऍग्रो केअर कृषी मंच व कृषी भूषण महाराष्ट्र संयुक्त विद्यमानाने राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते कृषी विद्यापीठातील संशोधक विस्तारक प्राध्यापक उद्योजक व शेतकरी अशा 35 व्यक्तींना ऍग्रो आयडल पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं यावेळी वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयराम पुरकर सिनेअभिनेत्री स्मिता प्रभू पोलीस निरीक्षक जगदीश नलावडे भूषण निकम राजेंद्र भामरे उल्हास बोरसे अमर ठाकरे रोहिणी पाटील हेमंत सोमवंशी उपस्थित होते.
यावेळी या सोहळ्यामध्ये कृषी शेतकरी उत्पादक इत्यादींचा सन्मान झाला डॉक्टर मत्स्यगंधा पाटील डॉक्टर जयप्रकाश गायकवाड डॉक्टर शेख जिबना. डॉक्टर इंद्रा घोरमोडे डॉक्टर अमोल विरकर डॉक्टर माधव पाटील विशाल यादव शंकर अदानी डॉक्टर हनुमान गरुड डॉक्टर जितेंद्र दोरगे व डॉक्टर बी बी गायकवाड साईनाथ गाडेकर गणेश मिसाळ डॉक्टर प्रणिती सोनवणे कृपा डॉक्टर अभय कुमार बगडे डॉक्टर श्याम गावंडे डॉक्टर संतोष गहूकर अनिल वानारसे अजय बच्छाव अर्चना सवाई दिलीप फुके मारुती भाबड अभय कुमार काळोखे मेघ शाम बोर सीमा पाटील वैशाली महाजन रेणुका राऊत कडप्पा सिंदगी महेश शेळके मिलिंद भोर इत्यादींचा सोहळ्यामध्ये सत्कार व सन्मान करण्यात आला चौदाव्या राष्ट्रीय ऍग्रो आयडल अवार्ड 2022 चे नाशिक मध्ये आनंदी उत्साही वातावरणात वितरण पार पडले