उद्धव ठाकरे सेनेचे बारा माजी नगरसेवक शिंदे सेनेत.
नाशिक जनमत. संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर आज अचानक बारा नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले आहेत. काल दिवसभर नाशिक शहरातील हालचाली चालू होत्या. उद्धव सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधातील तक्रारीची दखल न घेतली असता श्राद्ध घालू असे विधान खासदार संजय राऊत यांनी बुधवारी नाशिक मुक्कामी केल्या नंतर. काल रात्री उशिरा नाराज माजी नगरसेवक 12 जण गुरुवारी दुपारी मुंबईकडे गेले असल्याची चर्चा होती रात्री उशिरा सर्वजणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांचे शिवसेना या पक्षात मुख्य मंत्रीदालनातएकत्र आले होते यावेळेस सर्वांनी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसापासून नाराज नगरसेवकांच्या शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू होती तिला अखेर पूर्ण विराम मिळालेला आहे अजूनही एक मोठा गट शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे माझी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते. पुनम दिगंबर मोगरे. सूर्यकांत लवटे .आर डी धोडगे. चंद्रकांत खाडे .ज्योती श्याम खोले. सुदाम ढेमसे. सुवर्ण मटाले. डी जे सूर्यवंशी. श्याम कुमार साबळे. हे व अन्य काही मावळते नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे प्रवेशासाठी रात्री मुंबईत जाऊन धडकले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यासोबत मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले आणि भाजप माजी नगरसेविका कोमल मेहरोलीया यांचे वडील प्रताप मेलोरिया प्रवेश करणार असल्याचे माहिती मिळत आहे. दरम्यान हेमंत गोडसे यांनी सांगितले की या सर्वांच्या माध्यमातून नाशिक शहराच्या लवकरच विकास साधला जाईल. व मोठ्या प्रमाणात अजूनही काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत असे सांगितले. हा सर्व प्रकार संजय राऊत यांच्या विधानानंतर घडला असल्याचे बोलले जात आहे.