गंगापूर रोड येथे रिक्षात बसलेल्या महिलेचे दागिने लांबवले
गंगापूर रोड येथे रिक्षात महिलेचे दागिने लांबवले
- नाशिक जन्मत| नाशिक मध्ये सोनसाखळी चोरी तसेच बाहेरगावावरून आलेल्या प्रवासी यांच्या चोऱ्या हे नेहमी नाशिक मध्ये आता घडत चाललेले आहे. आणि दररोज अशा घटना दररोज घडतच आहे काल रिक्षा प्रवासात महिलेचे पिशवीत ठेवलेले
सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले. अभिनव शाळा गंगापूर रोड ते रविवार कारंजा या प्रवासात हा प्रका घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. प्रशांत निकम (रा. पंडित कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आई आणि मुलगी घरातून अभिनव शाळा येथून रविवार कारंजाकड जाण्याकरता रिक्षामध्ये बसले होते. अशोकस्तंभजनावरांच्या दवाखाना येथे रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली. येथे दोन महिला प्रवासी बसल्याने या महिलांन आजी थोडे तिकडे सरका, नातूला मांडीवर घ्या, शेजार बसवा असे बोलून गर्दी करत बोलण्याच्या नादात ठेवून दुसऱ्या महिलेने निकम यांच्या आईच्या लहान पिशवीत ठेवलेले एक लाख ४ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविवार कारंजा येथे उतरल्यानंतर काही वेळाने पिशवी पाहिली असता दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. रिक्षाचालक या महिलांच्या सोबत असल्याचा संशय असून पोलिस रिक्षाचा शोध घेत आहे. लवकरात लवकर गंगापूर पोलिसांनी या रिक्षाचा शोध घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी व महिलावर्ग करत आहे.