त्र्यंबकेश्वर येथे मामाने भाच्यावर घातली गोळी भाचा ठार. शेतीचा वाद.

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी जमिनीच्या वादातून मामाने भाच्यावर गोळीबार करत खून केल्याचा प्रकार त्र्यंबकेश्वर येथे घडला आहे. याप्रकरणी त्रंबकेश्वर येथे खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश परदेशी राहणार पाच आळी त्र्यंबकेश्वर. येथे तक्रारीनुसार भाऊ निलेश रामचंद्र परदेसी व 41 हा निलगिरी पर्वता मागे आईच्या वडिलोपार्जित मालकीच्या शेतजमिनी मध्ये फिरण्यास गेलेला होता. संशयित मामा गोविंद रामा दाभाडे यांनी जमिनीच्या हक्काचा वाद यावेळेस घातला. संशयित दाभाडे आणि अनोळखी व्यक्तीने निलेश वर गोळीबार केला. यामध्ये निलेशच्या छातीला गोळीबार ला गोळी लागल्याने तो जागेवरच गत प्राण झाला. त्र्यंबकेश्वर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षण बिपिन शेवाळे यांच्या पथकाने दाभाडे यास अटक केली आहे साथीदाराचा शोध सुरू असून सुपारी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे.