नाशिक शहरात काल वेगवेगळ्या भागात तिघांनी केली आत्महत्या.
नाशिक शहरात वेगवेगळ्या घटनांत तिघांची आत्महत्या
प्रतिनिधी नासिक जन्मत
|
नाशिक वाढती महागाई धावपळ. व आलेले निराश्य या घटनेतून आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. काल नाशिक शहरामध्ये
वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिला व एक पुरुषाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आले. संबधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इंदिरा गांधी वसाहत येथे एका २८ वर्षीय महिलेने घरी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. राजीवनगर येथे २० वर्षीय महिलेने घराच्या छतास लोखंडी पाइपला पांढऱ्या रंगाच्या ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. भोर टाउनशिप येथे रामेश्वर चव्हाण (३२) यांनी राहत्या घरी लोखंडी हुकला सुती पांढऱ्या रंगाच्या दोरीने गळफास घेत आत्महत्याकेली. मनुष्यास एकदाच मनुष्य जन्म मिळत असून आनंदी व समाधानी राहणे आवश्यक आहे त्यांचा नाव न घेता समाधानी राहणे ही कला अवगत करणे महत्त्वाचे आहे या घटनांचा अंबड, पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली.