ब्रेकिंग

46 दिवसात पाचवा अपघात.केदारनाथ येथे हेलिकॉप्टरचा अपघात. पाच भाविक ठार. खराब हवामानामुळे अपघात झाला ?

नाशिक जन्मत आज पाच वाजून 17 मिनिटांनी केदारनाथ मध्ये अपघात झाल्याचे दिसून आले आहे.केदारनाथधामकडे जाणाऱ्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यामधील जंगलात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 7 प्रवासी होते. अपघातानंतर रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरु आहे. याबाबत सविस्तर स्थानिक जनावरे की काही व्यक्तींना एका मनुष्याचे प्रेत दिसले. यानंतर हेलिकॉप्टर ची दुर्घटना झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रशासना ला माहिती कळवण्यात आली.

 

प्राथमिक तपासात अपघाताचे कारण खराब हवामान असल्याचे समोर आले आहे. गौरीकुंड-सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली होती. त्यामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावून जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आर्यन एव्हिएशनचे हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा पुरवत होते. यात्रेच्या हंगामात हजारो भाविक हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ गाठतात. अपघातानंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातातील मृतांची अधिकृत माहिती आणि तपशील लवकरच प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे. उत्तराखंड प्रशासनाकडून या घटनेचे दुःख व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे भाविकांमध्ये शोक व्यक्त करत येत आहे. हेलिकॉप्टर प्रवास किंवा कोणताही प्रवास सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. आमदाबाद येथील दुर्घटनेनंतर पुन्हा हेलिकॉप्टरची दुर्घटना घडल्याने हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट पसरलेले आहे. दरम्यान यात्रा चालू झाल्यापासून 46 दिवसात हा पाचवा अपघात झाला आहे. महाराष्ट्रातील दोन भाविकांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.  मृत्यू ची सहा ते सात असू शकते.

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे