दिव्यांग बांधवांना दिवाळी निमित्ताने फराळ वाटप. नाशिक जनमत चे संपादक चंद्रकांत धात्रक. यांना समाज भूषण पुरस्कार.
दिव्यांग बांधवांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप.नाशिक जनमत चे संपादक चंद्रकांत धात्रक यांना समाज भूषण पुरस्कार.
बाळासाहेब घुगे, बाळासाहेब सोनवणे यांना वंजारी समाज भुषण पुरस्कार
नाशिकः प्रतिनिधी
न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था, रामलीला एज्युकेशन सोसायटी संचलित क्रांतिवीर वसंतराव नाईक क्रांती सेना ,भारतीय जनता पक्ष, दिव्यांग विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना दिवाळीनिमित्त शनिवारी (दि.२२) रोजी फराळ वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी दिव्यांग विकास आघाडीचे उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे, राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांना वंजारी समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सिडकोतील स्वामी विवेकानंद येथे आयोजीत कार्यक्रमास व्यास पिठावर आ. सीमा हिरे, भाजपा सरचिटणीस जगन पाटील, ब्रह्माकुमारी उज्वला दिदी, ब्रह्माकुमारी कावेरी दिदी, प्रहार संघटनेचे दत्तु बोडके, कृषी विभागाचे अधिकारी रणजित आंधळे, के के सानप , माजी नगरसेविका छाया देवांग, साहेबराव आव्हाड,.अभ्युदय बँकेचे उत्तम सानप, रवी पाटील, देवा वाघमारे, डॉ.उल्हास कुटे, अर्चना दिंडोरकर, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.
आ. सीमा हिरे यांनी दिव्यांग आघाडी आणि बाळासाहेब घुगे, यमुना घुगे यांच्या कार्याचा गौरव केला. हे दाम्पत्य दीव्यांग असुन दिव्यांगांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहे. यावेळी बाळासाहेब सोनवणे यांनी दिव्यांगंच्या योजनांविषयी माहिती दिली.डॉ.उल्हास कुटे यांनी दिव्यांगासाठी हॉस्पिटल तयार करण्याचा मानस व्यक्त केला. ब्रह्माकुमारी उज्वला दिदी यांनी आपल्या परिसातील ब्रह्माकुमारी संस्थेत सर्वांनी राजयोग मेडीटेशन करुन जिवनात सुख शांती मिळवावी असे आवाहन केले. दत्तु बोडके, देवा वाघमारे, के के सानप यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी दीव्यांग बांधवाना फराळाचे वाटप करण्यात आले. पत्रकारांचा देखील गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास सुनील सोनवणे, क्रांतीसेनेचे अध्यक्ष अरुणा दरगुडे, क्रांती सेनेच्या पिटु भाऊ काळे , भाऊ पाटील चकोर,शिवाजी शेळके, डी बी राजपूत, प्रदिप केकाणे, सुनिल सोनवणे यांच्यासह दीव्यांग बांधव , नागरीक उपस्थित होते.
“
चौकट
पत्रकारांचा गौरव
दैनिक लोकनामाचे उपसंपादक धनंजय बोडके, पुढारीचे शेळके, दैनिक लोकमत चे नरेंद्र दंडगव्हाळ, दैनिक पुण्यनगरीचे अजय पाटील देशदूतचे निशिकांत पाटील , शैलेंद्र साळी प्रमोद दंडगव्हाळ नाशिक जनमतचे चंदकांत दादा धात्रक ज्ञानेश्वर काकड यांना समाज भुषण पुरस्कार देण्यात आला