अंबड पोलिसांची कामगिरी. पंधरा ठिकाणी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. अठ्ठावीस तोळे सोनं जप्त 20 लाखाचा मुद्देमाल हस्तगत.
नाशिक जनमत नाशिक शहरातील अंबड परिसरात 14 ठिकाणी घरफोडी करणारे सातपूर येथे एका ठिकाणी घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना अंबड पोलिसांतर्फे अटक करण्यात आली आहे. घरफोडी करणारे यांच्याकडून वीस तोळे सोनं अंबड पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे याची अंदाजे किंमत जवळपास 28 लाख रुपयांच्या वर आहे
तिघे गुन्हेगार असून त्यांच्यावर जबीरी चोऱ्याा खून असे अनेक गुन्हे दाखल असल्याचे नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितल. अंबड पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे नागरिकांचा अंबड पोलिसांवर अभिनंदन चा वर्षाव होत आहे. दरम्यान काही भागांमध्ये पोलिसांनी गस्त वाढावी अंबड परिसरातील एमआयडीसी परिसर चुंचाळे परिसर डीजीपी नगर 2 महालक्ष्मी नगर इत्यादी परिसरामध्ये गुन्हेगारी वाढत असून दिवसा व रात्री ची गोष्ट वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्यावर मारामाऱ्या करण्याचे प्रमाण वाढत आहे शुल्लक कारणावरून दोन जणांमध्ये वाद होतो त्यानंतर दोघांकडून फोन केल्या जातो त्यानंतर दोन्ही साईटचे दहा दहा युवक जमतात व एकमेकाला मारहाण करतात अशा घटना घडू लागले आहेत त्यामुळे नाशिककर भयभीत आहे भय इथले अजूनही संपत नाही असा प्रकार घडत आहे. युवक क्रोधाला आवर घालत नाही भविष्यात घडणाऱ्या त्याबद्दल चिंता करत नाही. आई-वडिलांनी देखील मुलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. भानगडी तंटे सम उपचाराने सोडावीत. क्रोधाला आवर घालावा. संयम नम्रता असू द्यावी. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये. चांगले शिक्षण घेऊन आई-वडिलांनी बघितले चांगले स्वप्न पूर्ण करावे आशि व्यक्ती गत मत नासिक जनमत संपादक मत यांनी व्यक्त केले. अंबड पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नासिक जनमत कडून अंबड पोलीस स्टेशन च्य सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शुभेच्छा.