नाशिकच्या सिविल हॉस्पिटल मध्ये महिलेचा मृत्यू उपचारात हलगर्जीपणा नातेवाईकांचा आरोप.
जिल्हा रुग्णालयात उपचारात हलगर्जीमुळे महिलेचा मृत्यूनातेवाइकांचा आरोप, पोलिसांत तक्रार.
नाशिक जन्मत | प्रतिनिधी नाशिक शहरातील सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी भागातून रुग्णू उपचारासाठी येत असतात. काल प्रस्तुती साठी आलेल्या गिरणारेतील दीपाली संतोष झोले या
गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान उपचारात हलगर्जीपणा केल्याने संसर्ग होऊन मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाइकांनी करत जिल्हा रुग्णालयात येत संबंधितांवर कारवाईची मागणी केली तसेच अंबड पोलिसात तक्रार करत संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली आहे. झोले यांना २० जानेवारीला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सिझेरियननंतर त्यांना गिरणारे ग्रामीण रुग्णालयात नेले. नातेवाईकांच्या आरोपानुसार प्रकृती बिघडल्याने दीपाली यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारात हलगर्जीपणा झाल्याने जंतुसंसर्ग होऊन त्यांचे अवयव निकामी होत होते. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे उपचारादरम्यान, मंगळवारी (दि. ४) त्यांचा मृत्यू झाला..
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी व्हिसेरा राखून ठेवला, असून चौकशी सुरू आहे असे सांगितले सांगितले आहे
दीपाली झोले यांचे शवविच्छेदन केले असून व्हिसेरा राखून ठेवला आहे. यासंदर्भात चौकशी केली जात आहे. – डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक