ब्रेकिंग
पाथर्डी फाटा परिसरात कारच्या धडकेत चार वर्षीय मुलाचा मृत्यू

पाथर्डी फाटा परिसरामध्ये कारच्या धडकेत चार वर्षीय बालकाचा मृत्यू.
नाशिक | पाथर्डी फाटा परिसरातील एक हॉटेलमध्ये प्रवेशद्वारातून आत जाणाऱ्या कारने चार वर्षाच्या बालकाला धडक दिली. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. बुधवारी (दि. ५) रात्री उशिरा ही घटना घडली असून संशयित कार हॉटेलचालकाचीच असून त्याच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातचे काम सुरू होते. या अपघातात हा बालक त्याच्या आई सोबतच असताना तो हात सोडून तो थोडा बाजूला जाताच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.