गुन्हेगारीब्रेकिंग

मुलीच्या प्रेमविवाहचा राग ; डोक्यात कुकर घालत पित्याकडून पत्नीचा खूनगंगापूररोडवरील घटना; कोयत्यानेही केले वार, संशयित ताब्यात.

मुलीच्या प्रेमविवाहचा राग ; डोक्यात कुकर घालत पित्याकडून पत्नीचा खूनगंगापूररोडवरील घटना; कोयत्यानेही केले वार, संशयित ताब्यात

 

प्रतिनिधी । नाशिक जन्मत

 

मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी पत्नीच्या डोक्यात आधी कुकर मारून आणि नंतर कोयत्याने वार करत सविता गोरे चा खून केल्याचा प्रकार मंगळवारी  दुपारी दहा ते बाराच्या दरम्यान घडला 

गंगापूररोडच्या प्रमोदनगरमध्ये घडली. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पतीला अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती आणि

 

मुक्ता लिखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, छत्रगुण मुरलीधर गोरे (४८) हे पत्नी सविता गोरे (४५, रा. स्वस्तिक बिल्डिंग, बी विंग, चौथा मजला, फ्लॅट नंबर २४, प्रमोदनगर, गंगापूररोड) येथे कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्या एका मुलीने आई-वडिलांची पसंती नसताना विरोधात जात लग्न केले. याचा राग छत्रगुण गोरे याच्या डोक्यात होता. या कारणातून ते नेहमीच पत्नी सविता गोरे यांच्यासोबत भांडण करत असत. मंगळवारी दुपारी सविता या पार्किंगमध्ये आलेल्या मुलीशी फोनवरून बोलत होत्या. त्यावेळी देखील छत्रगुण हे पत्नी सविता यांच्याशी वाद घालत होते. दुसरीकडे

सविता या फोनवर मुलीशीही बोलत असतानाच छत्रगुण याने पत्नीच्या डोक्यात कुकर मारला. त्या खाली पडताच तोंडावरही कुकर मारत जखमी केले. त्यानंतर कोयत्यानेही त्याने पत्नीवर वार केले. दरम्यान, फोनमध्ये किंचाळण्याचा आवाज आल्याने इमारतीच्या पार्किंगमध्ये फोनवर बोलत असलेली मुलगी वर फ्लॅटपर्यंत आली. दरवाजा आतून बंद होता. तो उघडण्याचा खूप प्रयत्न केला. काही वेळातच छत्रगुण यानेच दरवाजा उघडला आणि पळून गेला. तोपर्यंत सविता यांचा मृत्यू झाला होता. मुलीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. रात्री उशिरा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास गंगापूर पोलीस स्टेशन चे अधिकारी करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे