किरण आव्हाड यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन. किरण ने जाताना नी दुसऱ्याला दृष्टी देऊन गेला.
नाशिक जन्मत व्ही एन नाईक संस्थेचे अध्यक्ष श्री कोंडाजी मामा आव्हाड यांचे ज्येष्ठ सपुत्र. किरण आव्हाड यांचे काल हृदयविकाराच्या आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाने आव्हाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
किरण आव्हाड हे बांधकाम व्यवसाय तसेच पेट्रोल पंप व्यवसाय बघत होते. अतिशय हस्तमुख व सर्व मित्र परिवाराला हवाहवासा मित्र ते होते. आपल्या परिवाराचे मोठे असल्याने. व्ही एन नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी सर्व कारभार त्यांना सोपवला होता. सर्व नात्यागोत्यामध्ये व समाजामध्ये लोकप्रिय असलेले किरण आव्हाड हे तब्येतीने देखील चांगले होते. त्यांना पत्नी व दोन मुले असा परिवार त्यांचा आहे. आई वडील व एक लहान भाऊ त्यांच्या परिवारात आहे. आई वडील किरण ची पत्नी मुले व भाऊ वहिनी नातेवाईक यांच्या परिवारातून किरण अचानक निघून गेल्याने दुःखाचा डोंगरच आव्हाड परिवाराला कोसळला आहे.
किरण आव्हाड आपल्या मित्रांना व परिवाराला सांगत असायचा की माझ्या नंतर माझे डोळे हे मला दान करायचे आहे. तब्येत वगैरे सर्व ठीक असताना परवा रात्री सर्वसामान्यांप्रमाणे कुटुंबाबरोबर जेवण केले व रात्री ते झोपी गेले.
रात्री एक वाजता त्यांना छातीत त्रास झाल्याने सिग सिग्मा हॉस्पिटल येथे ऍडमिट केले. त्यावेळेस ते अगदी सावध होते. परंतु प्रकृती बिघडत असल्याचे त्यांना कळाले. त्यांनी आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर यांना व आपल्या वडिलांना फोन करून जवळ बोलावले. आणि डॉक्टर व वडील कोडाची मामा आव्हाड यांना सांगितले की मला काही कमी जास्त झाले तर माझे डोळे दान करा. माझ्या निमित्ताने कुणाचे तरी डोळ्याला दृष्टी येईल. हा त्यांचा दृढ संकल्प त्यांनी बोलून दाखवला.
कोंडाजी मामा आव्हाड यांनी व डॉक्टर यांनी फोन करून डोळ्याचे डॉक्टर यांना बोलून घेतले. अखेर जीवन वाचण्यासाठी प्रयत्न करणारे किरण दादांची प्राणज्योत मालवली. परंतु जाताना जाता जाता आपले डोळे दुसऱ्याला कामे येऊन त्याला दृष्टी देऊन किरण दादा गेला..
काल नाशिकच्या गोदावरी तीरावर अमरधाम मध्ये किरण दादा वर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वंजारी समाजासह संपूर्ण राज्यातून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात राजकीय सामाजिक नातलग मित्रपरिवार मोठ्या संख्येने अंत्यसंस्काराच्या वेळी हजर होते.
आव्हाड परिवारासह मित्र नातलग परिवारामध्ये किरण आव्हाड यांच्या अचानक मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. कोंडाजी मामा आव्हाड यांच्या परिवाराला परमेश्वर हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच नाशिक जनमत परिवार संपादक चंद्रकांत धात्रक यांची परमेश्वराला विनंती. नाशिक जन्मत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.