निसर्गची किमया.महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ ! बुलडाण्याच्या महिलेवर संभाजीनगरात उपचार.
महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ !
बुलडाण्याच्या महिलेवर संभाजीनगरात उपचार
प्रतिनिधी । चिखली
येथील जिल्हा महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या सोनोग्राफीत तिच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथे प्रसूतीसाठी हलवण्यात आले.
३२ वर्षीय महिला घाटाखालील रहिवासी असून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी तिची सोनोग्राफी केली होती. त्यानंतर हा प्रकार लक्षात येताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. झिने यांना माहिती कळवली. डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी ही बाब स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांच्याही कानावर टाकली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. बाळाच्या
‘फिट्स इन फिटू’चा प्रकार
हे ‘फिट्स इन फिटू’ नावाच्या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीचे उदाहरण आहे. जगभरात आजवर अशा २०० महिलांच्या बाबत प्रकार घडले आहेत. यातील १५ भारतात असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोटात बाळ स्पष्टपणे दिसत होते. कुठलाही धोका न पत्करता सदर महिलेची प्रसूती सुलभ होण्यासाठी आणि पोटातील बाळ वाचावे यासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. हे प्रमाण ५ लाखांत एखादे असते. आता पीडियाट्रिक सर्जनच्या देखरेखीखाली प्रसूती करून बाळाच्या पोटात असलेले मृत अर्भक काढून टाकता येईल. अशी प्रसूतीदेखील अतिशय किचकट असल्याने तिला संभाजीनगरला पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.