महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी सामना 23 ते 26 जानेवारी. बडोदा क्रिकेट संघाचे नाशिक मध्ये आगमन
![](https://nashikjanmat.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250120-WA0051.jpg)
महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी सामना 23 ते 26 जानेवारी.
बडोदा क्रिकेट संघाचे नाशिक मध्ये आगमन
नासिक जनमत चंद्रकांत धात्रक यांच्याकडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफीसामना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनथ कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.
या सामन्यासाठी आजच बडोदा क्रिकेट संघ नाशिक मध्ये दाखल झाला आहे.
बरेच कालखंडानंतर नासिक मध्ये महाराष्ट्र विरुद्ध बडोदा सामना होत असल्याने नासिक कारण मध्ये आनंदाचे वातावरण आहे. नासिक जिल्ह्यातील युवा खेळाडूंना या क्रिकेट सामन्यामुळे ऊर्जा डोस मिळणार आहे. ऋतुराज गायकवाड कुणाल पांड्या खेळण्याची दाट शक्यता आहे. गोल क्लब अनंथ कान्हेरे मैदाना या सामन्यासाठी सज्ज झालेले आहे.
या बडोदा क्रिकेट संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे :
१- कृणाल पंड्या – कर्णधार
२- विष्णू सोळंकी – उपकर्णधार
३- जोस्निल सिंग
४- शिवालिक शर्मा
५- शाश्वत रावत
६- मितेश पटेल – यष्टीरक्षक
७- अतित सेठ
८- राज लिम्बाणी
९- महेश पिठीया
१०- भार्गव भट
११- आकाश सिंग
१२- निनाद राठवा
१३- अभिमन्यू सिंग राजपूत
१४- लुकमान मेरीवाला
१५- अक्षय मोरे – यष्टीरक्षक
१६- नित्या पंड्या
१७- सुकीर्त पांडे
१८-बाबासाफी पठाण
मुख्य प्रशिक्षक – मुकुंद परमार , गोलंदाजी प्रशिक्षक – अरविंद श्रीनाथ , क्षेत्ररक्षण प्रशिक्षक – हिमांशू जाधव
आणि संघ व्यवस्थापक – धर्मेद्र ( राजू ) आरोठे.
हा बडोदा संघ उद्या दुपारी २३० वाजता अनंत कान्हेरे मैदानावर सराव करणार आहे.