जाणता राजा’ तीन दिवस आयोजित महानाट्याची झाली सांगता*
*‘जाणता राजा’ तीन दिवस आयोजित महानाट्याची झाली सांगता*
*नाशिक, दिनांक 4 मार्च, 2024 (नाशिक जनमत वृत्तसेवा) :* छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, नीती, चरित्र्य व विचारांची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी ‘जाणता राजा’ या महानाट्याचे शहरात 2 ते 4 मार्च, 2024 हे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षक व रसिकांच्या उर्स्फूत प्रसिसादाने 1 हजार 188 व्या प्रयोगाने या महानाट्याची सांगता झाली.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान, पुणे निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित जाणता राजा महानाट्याचे नाशिक शहरात तीन दिवस संभाजी स्टेडियम या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त तसेच शिवाजी महाराजांच्या कार्यकुशलतेची महती जनसामान्याना विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्दशाने प्रशासानाच्या वतीने महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
“जाणता राजा म्हणजेच प्रजेचा कष्ट, दुःख जाणनारा राजा आणि ते दुःख कष्ट दूर करणारा राजा. या महानाट्याच्या आयोजनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि जीवन याची प्रचिती प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता आली. हे महानाट्य रसिकांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनामार्फत महानाट्याच्या पासेसचे मोफत वितरण करण्यात आले होते. महानाट्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा स्टेजवर अफजल खानाचा वध, महाराजांची आग्र्याहून सुटका, सुरतेवर छापा अशा अनेक चित्तथरारक प्रसंगांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याची जिवंत अनुभूती रसिकांना झाली.
जाणता राजा या महानाट्यात साधारणत: 200 कलाकारांचा समावेश असून यात 35 ते 40 स्थानिक कलाकार सहभागी झाले होते. शिवकालीन पुनरूत्थान करण्यासाठी महानाट्यात घोडे, उंट या प्राण्यांचा उपयोग केल्यामुळे नाट्यातील प्रसंग अधिकाधिक विलोभणीय झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे असीम साहस, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांसाठी आदर्श आहेत.
2 ते 4 मार्च, 2024 हे तीन दिवस आयोजित जाणता राजा महानाट्य प्रयोगाला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.