विनोद यादव एम पी एल च्या सोलापूर रॉयल्सचे कंडीशनिंग कोच

विनोद यादव एम पी एल च्या सोलापूर रॉयल्सचे कंडीशनिंग कोच
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय एम पी एल – महाराष्ट्र प्रीमिअर लीग – स्पर्धेतील एक संघ सोलापूर रॉयल्स यांनी नाशिकच्या विनोद यादव यांची संघाच्या स्ट्रेन्थ व कंडीशनिंग कोच म्हणून निवड केली आहे. महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या आगामी दुसऱ्या हंगामासाठी – Season 2 – सदर निवड झाली आहे. श्रीलंकेचे माजी खेळाडू चामिंडा वास हे देखील या चमूत असतील.
विनोद यादव महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी फिजिकल ट्रेनर आहेत . यापूर्वीच्या हंगामात देखील विनोद यादव यांनी १६ व २३ वर्षांखालील संघाचे ट्रेनर पद भूषविले होते. विनोद यादव गेल्या सात वर्षांपासून नाशिक क्रिकेट संघटनेच्या पुरुष व महिला खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन करीत आहेत.
विनोद यादव यांच्या या निवडी बद्दल , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
सोलापूर रॉयल्स संघाचे संचालक पराग मोरे यांनी पुणे येथे पत्र दिले. त्याचेही छायाचित्र सोबत पाठवत आहे.