प्रदर्शनातून महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात केलेल्या विकास कामाची माहिती मिळाली.
*प्रदर्शनातून महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात केलेल्या विकासकामांची माहिती मिळाली
*:
*_अर्जुन पुरस्कार विजेते दत्तु भोकनळ यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप
*नाशिक, दि.5 मे,2022 (विमाका वृत्तसेवा)
कोरोनाकाळात सगळे बंद असतांना महाविकास आघाडी सरकारने आपल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवून जनतेची सेवा केली आहे. कोरोनाकाळात प्रत्येक व्यक्तीला कशाची कमतरता भासू शकते याचा बारकाईने अभ्यास करुन योजनेच्या माध्यमातून ती मदत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसून येते, असे मत अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांनी प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी व्यक्त केली आहे
मीडिया सेंटर, बी.डी.भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर आयोजित ‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी’ ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शन गेल्या पाच दिवसापासून सुरु आहे. या प्रदर्शनाचा समारोप अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सहायक संचालक मोहिनी राणे, माहिती सहायक किरण डोळस, प्रदर्शन सहायक संजय बोराळकर आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित हो
अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ पुढे म्हणाले की, कोरोनाकाळात शासनाने व प्रशासनाने केलेल्या कामाचा लेखाजोखा या प्रदर्शनाच्या माध्यमातून समजला. शासनाने कोरोनाकाळात कुणाला आरोग्य सुविधा कमी पडू नये यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर आवश्यक बाबींची पूर्तता करुन महाराष्ट्राने स्वयंपूर्णते कडे वाटचाल केली आहे. तसेच कृषी व इतर आवश्यक बाबीचींही पूर्तता केली असल्याचे प्रदर्शनातून दिसून आली आहे
श्री. भोकनळ यांनी प्रदर्शनात लावलेल्या प्रत्येक जाहिरात फलकाची माहिती जाणून घेतली. तसेच अनेक योजनाबद्दल शासनाचे आभार मानले. ते म्हणाले की कोरोनाकाळात शिवभोजन थाळीने अनेकांची भूक भागवली आणि आजही भागवतेय. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र शासनाचे काम अतिशय प्रभावी व भरीव कामे केली असून पुढील काळातही महाविकास आघाडी सरकारकडून या पेक्षाही अधिक चांगले काम होतील, असेही यावेळी श्री.भोकनळ यांनी सांगितले.
गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या प्रदर्शनाला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शासनाने कोरोनाकाळात लसीची मात्रा देण्याबरोबरच सर्व घटकांचा विचार करुन विकासाचीही मात्रा दिली आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या होत्या.