आजपासुन प्रजापिता ब्रह्माकुमारी ‘तर्फे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे द्वादश ज्योर्तिलिंग दर्शन साधूसंत, महंत व मान्यवरांची राहणार मांदियाळी

आजपासुन प्रजापिता ब्रह्माकुमारी ‘तर्फे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे द्वादश ज्योर्तिलिंग दर्शन
- साधूसंत, महंत व मान्यवरांची राहणार मांदियाळी
नाशिक/ त्र्यंबकेश्र्वर
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य १२ ( द्वादश ) ज्योर्तिलिंग व शिव परमात्मा दर्शनचे दि.२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर पर्यंत आयोजन केले आहे. त्र्यंबकेश्वर येथील मेनरोड वरील हॉटेल त्रिवेणी समोर होणाऱ्या कार्यक्रमास संस्थेच्या संयुक्त प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दीदी अध्यक्षस्थानी असणार आहेत. दिनांक २ सप्टेंबर रोजी सदर द्वादश ज्योतिर्लिंग व आध्यात्मिक प्रदर्शनीचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क आहे. दरवर्षी संस्थेतर्फे द्वादश ) ज्योर्तिलिंग दर्शन उपक्रमाचे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत असते. त्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो.
त्र्यंबकेश्वर येथील महंत शंकरानंद सरस्वती (आनंद आखाडा) , महंत धनंजय गिरि (निरंजनी आखाडा), महंत विष्णुगिरी (जुना आखाडा),महंत दुर्गानंद ब्रम्हचारी (अग्नि अखाडा), महंज उदयगिरी ( अटल आखाडा) , महंत गुरुप्रित सिंह( निर्मळ आखाडा) , महंत अजय पुरी (महानिर्वाणी आखाडा) , महंत गोपालदास (बड़ा उदासिन’ आखाडा) ,महंत यशनाथ ( गोरक्षनाथ मठ ), महंत देवराज पुरी (जुने महादेव मंदिर), महंत सिताराम बाबा (सिताराम आखाडा) , मनोज भेटे (अध्यक्ष, पुरोहित संघ त्र्यंबकेश्र्वर), प्रशांत गायधनी ( माजी अध्यक्ष, पुरोहित संघ), सत्यप्रिय शुक्ल यांच्यासह सर्व संत, महंत तसेच माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर,माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे, पुरोहित संघ सदस्य निशांत चांदवडकर,भाजपा शहराध्यक्ष सुयोग वाडेकर,देवस्थान विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल,भाजपा जिल्हा चिटणीस तृप्तीताई धारणे,त्र्यंबकेश्वर तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक आदि.मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी भाविकांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन नाशिकच्या मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी केले आहेत.