महाराष्ट्र
*राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीदिनानिमित्त भक्ती-शक्ती दिन घोषित करण्याची मागणी*

- *राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीदिनानिमित्त भक्ती-शक्ती दिन घोषित करण्याची मागणी* नाशिक जनमत. मा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जिलाधिकारी नाशिक यांच्या मार्फत राष्ट्र संत भगवान बाबा राष्ट्रीय जंयती उत्सव समिती चे पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन दिले आहे
राज्याचे मुख्यमंत्री मा ना एकनाथरावजी शिंदे यांना जिल्हा धिकारी नशिक यांच्या मार्फत आज दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथील समितीचे राष्ट्रीय पदाधिकारी यांनी एकत्र येऊन निवेदन देऊन राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त भक्ति शक्ति दिन राज्य शासनाने घोषित करून राज्यातील लाखो भाविक भक्तांच्या भावनांचा आदर करावा हि विनंती देखिल करण्यात आली आहे.
अध्यात्मिक क्षेत्रातील राष्ट्र संत भगवान बाबा यांचे गौरवशाली कार्य ऐतिहासिक आहे. देशाला अध्यात्मिक ज्ञान मार्ग दाखवताना भक्ति मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग या ञिवेणी संगमाची संकल्पना सर्व सन्मान्य माणसाच्या जीवनात सुख शांती समाधान निर्माण करत राष्ट्र निर्माणासाठी योगदान देण्यासाठी अध्यात्माच्या माध्यमातून लाखो विचारवंतांची फौज निर्माण करणारे जगद्विख्यात तत्वज्ञानी, स्वातंत्र्य संग्राम, निजामशाही आणि इंग्रज यांच्या जुलामला त्रस्त झालेल्या जन सामान्यांना अध्यात्मिक ज्ञान मार्ग वर एकत्र करत लाखों लोकांच्या मनात विश्वास शक्ति निर्माण करत जीवन जगण्याची उमेद निर्माण करणारे समाजसुधारक, शांतीमार्गाने गो-हत्या बंदीचे जनक, शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहवणारे आधुनिक भगिरथ, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी भरीव योगदान, अनेक देश हितार्थ कार्याची नोंद त्यांच्या नावावर सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी एवढ अगाध आणि महान कार्य त्यांच्या नावावर आहे ते महान तपस्वी,नव निधी अष्ट सिद्धी प्राप्त राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी धौम्यगडावर येवून धौम्यगडाचे भगवानगड असे नामकरण केले तसेच देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी तात्कालीन दुरसंचारमंत्री प्रमोदजी महाजन व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याकडून बाबांच्या कार्याची महती एकताच भारत सरकारने राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित केले अशा भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त देशातील लाखो भक्त भक्ति-शक्ति दिन स्वइच्छेने साजरा करतात.
तरी मा.साहेबांना विनंती की, सामाजिक समता स्थापित करण्यासाठी जिवन समर्पित करणारे राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे वेगवेगळ्या समुहातील लाखो भाविकांच्या भावनांचा विचार करुन राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीदिनानिमित्त दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रकाशित होणार्या ग्रेगोटिअल दिनदिर्शिकेमध्ये, तसेच विविध दिनदर्शिकेमध्ये, विविध सरकारी कार्यालयात राष्ट्रसंत भगवानबाबा जयंती भक्ती-शक्तीदिन म्हणून दर्शविण्यात येवून जयंती साजरी करण्याचे आदेश देण्यात यावेत ही विनंती. निवेदनाद्वारे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घुगे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे राष्ट्रीय उपाध्यक्ष मदा ताई फड राष्ट्रीय सचिव बी के नागरेसर विशाल विलास पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष वैशाली ताई कराड राज्य उपाध्यक्ष रंगनाथ दरगुडे सह समाज बांधवयांनी केली मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते .